शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरु; भर पावसात मूक आंदाेलनाची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 07:06 IST

कोल्हापुरातून अंतिम लढाईची ज्योत प्रज्वलित : राज्य सरकारकडून दखल; चर्चेचे निमंत्रण. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधीस्थळी बुधवारी झालेल्या मूक आंदोलनात राज्यभरातून आलेले मराठा समाजातील प्रमुख समन्वयक तसेच जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत अंतिम लढाईची ज्योत प्रज्वलित झाली.  

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोणत्याही वर्गाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी रस्त्यावरील अंतिम लढाईला बुधवारी ऐतिहासिक कोल्हापुरातून जोरदार पावसाच्या साक्षीने सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाचे रणशिंग फुंकताना मराठा समाज आता आरक्षण मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा संदेश या मूक आंदोलनातून देण्यात आला. 

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधीस्थळी बुधवारी झालेल्या मूक आंदोलनात राज्यभरातून आलेले मराठा समाजातील प्रमुख समन्वयक तसेच जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत अंतिम लढाईची ज्योत प्रज्वलित झाली.  या आंदोलनाची दखल  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने घेतली असून, आमच्या अखत्यारीतील ज्या पाच प्रमुख मागण्या आहेत, त्या चर्चेतून सोडविण्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून चर्चा घडवून आणली जाईल, आपण चर्चेला यावे, अशी आग्रही विनंती दोन्ही मंत्र्यांनी खासदार संभाजीराजे यांना केली. 

पालकमंत्री सतेज पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षण मिळवून देण्याच्या बाबतीत राज्य सरकार ठाम आहे, यापूर्वी झालेल्या चुका टाळून आरक्षण देईपर्यंत जी-जी जबाबदारी राज्य सरकारची असेल ती-ती पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट केले. ‘वाट्टेल ती किंमत देऊ; पण आरक्षण मिळवून देऊ,’ अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जी चूक मागच्या राज्य सरकारकडून झाली, तीच चूक आमच्या सरकारकडूनही झाली. आता राजकारण करीत न बसता या चुका मान्य करून समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या प्रक्रियेत भाजपनेदेखील सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. 

- पंतप्रधान का बोलत नाहीत? मराठा आरक्षणाचे आंदोलन गेली अनेक वर्षे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत युक्तिवाद झाले तरीही आरक्षण मिळाले नाही. मराठा समाज अस्वस्थ असताना आणि तो आरक्षण मागत असताना केंद्र सरकारचे प्रमुख असणारे पंतप्रधान याबाबत का बोलत नाहीत, असा सवाल शाहू छत्रपती यांनी या वेळी उपस्थित केला. 

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण