शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण : शिंदे सरकारची मोठी कोंडी; प्रश्न कसा सोडवावा हाच एकमेव प्रश्न, देशभरात वादळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 08:06 IST

एकीकडे मराठा समाजाचा आरक्षणाबाबत मोठा दबाव आणि दुसरीकडे कायदेशीर अडचणी, असा पेच सरकारसमोर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारच्या अतिविराट सभेत दिलेल्या इशाऱ्यानंतर आता या आरक्षणाबाबत नेमके काय करायचे आणि प्रश्न सोडवायचा कसा, यावरून एकनाथ शिंदे सरकारची प्रचंड कोंडी झाल्याचे चित्र आहे. 

एकीकडे मराठा समाजाचा आरक्षणाबाबत मोठा दबाव आणि दुसरीकडे कायदेशीर अडचणी, असा पेच सरकारसमोर आहे. ओबीसींमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर ओबीसींमधून त्यास तीव्र विरोध होण्याची दाट शक्यता आहे. कारण, अनेक ओबीसी संघटनांनी आधीच आंदोलनांद्वारे विरोधाचा सूर लावला आहे. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण दिले, तर शैक्षणिक, आर्थिक आरक्षणाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण मिळेल. त्यामुळे विरोधाचे सूर अधिक तीव्र आहेत. राज्य सरकारसमोर आजमितीस काही पर्याय आहेत. 

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले आहे. ही याचिका विचारात घेण्यासाठी लवकरच सूचिबद्ध केली जाईल, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी स्पष्ट केले होते. 

न्यायालयात टिकेल का?मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याचा शासन निर्णय (जीआर) काढण्यातही अनेक कायदेशीर अडचणी आहेत. असा जीआर काढला, तर मराठा समाजाला आरक्षण नाकारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या या आधीच्या निर्णयाला छेद जाईल. तरीही जीआर काढला, तर तो न्यायालयात टिकेल का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

‘समाजासाठी जीव जात असेल तर आनंदच’nराजकीय कारकीर्दीत  मी अनेक मराठा नेत्यांसोबत काम केले आहे. माझे काहीतरी योगदान आहे. मला मात्र आज मराठ्यांनी मोठे केले असे सांगत शिव्या दिल्या जातात. मात्र, मला शिवसेना आणि बाळासाहेबांनी मोठे केले. 

मराठा समाज नादान किंवा असंस्कृत नाही. माझ्यामुळे त्यांच्यात फूट पडणार नाही. मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. मात्र अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही. माझ्या समाजासाठी माझा जीव जाणार असेल तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

बैठकी घेणार ? मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत आक्रमक असून, जरांगे पाटील यांनी दिलेली डेडलाइन लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर सुनावणी करावी, अशी विनंती राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला एक- दोन दिवसांत केली जाण्याची शक्यता आहे, तसेच पुढील आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे हे सर्वपक्षीय बैठक घेण्याचीही शक्यता आहे. 

अशीही होणार कसरतnलोकसभा निवडणूक सहा महिन्यांवर असताना घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचे राजकीय परिणाम काय होतील, हादेखील महत्त्वाचा पैलू असेल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणातील आगामी  निवडणुकीत ओबीसी मतदार सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे.

nइथल्या निर्णयाची झळ तिथे बसणार नाही, याची काळजी घेतानाही राज्य सरकारची कसरत होणार आहे. सत्तापक्षाबरोबरच प्रमुख विरोधी पक्षांचीही आरक्षणाबाबतच्या भूमिकेवरून कसोटी लागणार आहे.

‘इतरांचे आरक्षण मागून आपण संघर्ष वाढवतोय’अहमदनगर : मराठा आरक्षण हा सर्वांच्या भावनेचा मुद्दा आहे. परंतु तो भावनेचा करून चालणार नाही. भविष्यात टिकेल अशा कायद्याच्या चौकटीतील आरक्षणासाठी सरकारही प्रयत्न करत आहे. मात्र इतर समाजाचे आरक्षण मागून आपण संघर्ष वाढवतोय, अशी भूमिका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, मुळात पूर्वी राज्यात मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले तेव्हा त्यांची मागणी इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळण्याची होती. तीच सध्या आमचीही आहे. मात्र जरांगे यांचा आग्रह ओबीसीतून आरक्षणाचा आहे, असे विखे म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे