शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maratha Reservation: नांदेडला युवकाची आत्महत्या, मराठा आंदोलन सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 02:47 IST

मराठा आरक्षणासाठी अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे (३८) याने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या निषेधार्थ भोकरफाटा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

नांदेड/पुणे/औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे (३८) याने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या निषेधार्थ भोकरफाटा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला़माहिती मिळताच तहसीलदार डॉ़अरविंद नरसीकर, पोलीस तसेच सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली़ कचरू हा सुशिक्षित होता. तो हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करायचा़ त्याच्या पश्चात तीन मुली, पत्नी व वयोवृद्ध आई असा परिवार आहे. काकासाहेब शिंदे यांच्या धर्तीवर कुटुंबीयांस मदत मिळवून देण्यास शासनाकडे पाठपुरावा करू, मुलीच्या शिक्षणासाठी व वसतिगृह सोयीसाठी मदत करू, आईस दरमहा निराधार योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येईल व पत्नीस शासकीय सेवेत नोकरी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिले.मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको, धरणे आणि अर्धजलसमाधी आंदोलन करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्राप्त संदेशपत्र घेऊन राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर परळीत आले होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांना संदेशपत्र देत तसेच त्याचे वाचन करून आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. राज्य पातळीवरील समन्वयकांशी चर्चा करुन निर्णय कळविला जाईल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.मराठा क्रांती मोचातर्फे रविवारी पुणे जिल्ह्यात चिंचवडगावात झालेल्या श्रद्धांजली सभेवेळी टोळक्याने वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक केली. फुगेवाडी परिसरात पीएमपी बसवर दगडफेक झाली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिंचवड आणि देहूरोड पोलीस स्टेशनने परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मराठा मोर्चाने रविवारी पुण्यातही पुन्हा एकदा ‘एल्गार’ केला. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ््याला अभिवादन करुन, जिजाऊवंदनेने मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.राजू शेट्टींना विरोधहातकणंगले (जि. कोल्हापूर) येथे पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनस्थळी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी भेट दिली. मात्र, आंदोलकांनी त्यांच्यासमोर शंखध्वनी करीत प्रथम आपल्या पदाचा राजीनामा द्या व मगच बोलावे, अशा भावना व्यक्त केल्या. आंदोलकांनी ‘चले जाव, चले जाव, राजू शेट्टी चले जाव’ या घोषणा दिल्या.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण