शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

कोट्यवधी मराठे २४ डिसेंबरनंतर मुंबईत, मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 12:48 IST

Maratha Reservation: कोणाच्या दबावाखाली येऊन शासनाने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचे हे आंदोलन तुम्हाला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

जालना - अंतरवालीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. कोणाला अटक करणार नाही, असे आश्वासन दिलेले असताना लोकांना अटक केली जात आहे. कोणाच्या दबावाखाली येऊन शासनाने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचे हे आंदोलन तुम्हाला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी अंतरवाली सराटी येथे १७ डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.

शहरातील पांजरपोळ मैदानावर शुक्रवारी जरांगे-पाटील यांची सभा झाली. धनगर आरक्षणाबाबत ते भूमिका स्पष्ट करत नाहीत. ज्या जाती ओबीसीत आहेत त्या जातींवरही त्यांनी अन्याय केला आहे, अशी टीका त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली. 

आता आम्ही दंड आणि मांड्या थोपटल्या आहेत. लेकरांच्या न्यायासाठी कोणत्याही टाेकाला जाऊ. मुंबईत येऊ; परंतु उग्र आंदोलन करणार नाही आणि शांततेचे आंदोलन तुम्हाला पेलणार नाही. आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले असून, ३२ लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेले आहे. त्यामुळे कोणीही उग्र आंदोलन करू नये. - मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते

या प्रश्नांची द्या उत्तरेअंतरवाली सराटीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे का मागे घेतले नाहीत, कोणालाही अटक करणार नाही, असे आश्वासन दिलेले असताना आमच्या लोकांना अटक का केली, एमसीआर मिळालेला असताना पीसीआर कसा काय घेतला, आमच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना का रुजू केले, या प्रश्नांची उत्तरे शासनाने द्यावीत, अशी मागणीही जरांगे-पाटील यांनी सभेत केली.  

कुचेंवरही हल्लाबोल जरांगे-पाटील यांनी भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावरही हल्लाबोल केला. आंदोलनादरम्यान मध्यस्थीस तुम्ही आले होते; परंतु त्यांना दोन नावे कोणी दिली. बीडमधील मराठा बांधवांना धनंजय मुंडे गुंतवत असल्याचे आ. कुचे यांनी फोनवर सांगितल्याचा आरोप करत एमसीआरचा पीसीआर तुम्ही दोघांनी करायला लावला, असा संशय असल्याचेही ते म्हणाले. 

सभास्थळी उसळला लाखोंचा जनसमुदाय - १४० एकर मैदानावर सभेचे नियोजन करण्यात आले होते. १०० एकरांत पार्किंग आणि ४० एकरांत सभा झाली. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान ओले झाले होते.- परंतु अशा ओल्या मैदानावरही लाखोंवर मराठा समाजबांधवांनी शुक्रवारी सकाळपासून ते रात्री सभा होईपर्यंत हजेरी लावली होती.- जरांगे पाटील यांचे जालना शहरात स्वागत झाल्यानंतर २० हजार दुचाकींसह युवकांची रॅली काढण्यात आली. यावेळी जरांगे पाटील यांचे सर्वधर्मीयांच्या वतीने स्वागत करण्यात आले.  

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबई