बीड - मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात समाजाची बीड तालुक्यात ८ जूनला सभा होणार आहे. श्री क्षेत्र नारायणगडावर ९०० एकरांत सभा घेण्याचा निर्णय झाला असून, शुक्रवारी नारायणगडावरील बैठकीत जरांगे-पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली. गावागावांत बैठका घेण्यासाठी २० जणांची टीम तयार करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. या सभेत मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केली.
मनोज जरांगे-पाटील यांची बीडमध्ये ९०० एकरांत सभा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 07:52 IST