शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Maratha Reservation:”...त्याच दिवशी दिल्लीत खासदारकीचा राजीनामा देणार होतो”; छत्रपती संभाजी महाराजांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:36 IST

राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर ढकलत आहे. आम्हाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावं हीच अपेक्षा. सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली त्याचा कुठला पाठपुरावा केला आहे?

ठळक मुद्देपहिल्यांदा राज्य सरकारने जबाबदारी घेऊन मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक मागासलेले पण सिद्ध करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजेमराठा समाजाच्या वतीने मी पुढे येतो तुम्हीही आमनेसामने या होऊन जाऊ दे चर्चा असं मी म्हणतोय पण कुणीही येत नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला १५ पानी पत्र पाठवलं. या पत्रातही खूप तफावती आहे

नांदेड - संसदेचं अधिवेशन सुरु होतं. मराठा समाजाची भावना संसदेत मांडायची असं मी मागणी केली. पण मला बोलायला परवानगी दिली नाही. कुठलीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही. माझ्या समाजाची ताकद आहे. शिवशाहूचा वारसा गप्प बसणार का? दिल्लीत शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा दरबारात राजेंनी औरंगजेबाला धुडकावून लावलं होतं. मला जर त्या दिवशी बोलायला दिलं नसतं तर त्याच दिवशी खासदारकी सोडून टाकली असती असा गौप्यस्फोट खासदार छत्रपती संभाजी महाराज(Sambhajiraje Chhatrapati) यांनी केला आहे.

नांदेड येथील मराठा क्रांती मूक आंदोलनावेळी संभाजीराजे बोलत होते. ते म्हणाले की, मला बोलायची संधी मिळाली. ज्या शाहू महाराजांनी संपूर्ण भारतात पहिल्यांदा आरक्षण दिलं त्यावर बोलायला मिळालं नाही तर उपयोग काय? अशा भाषणानं मी सुरुवात केली. महाराष्ट्रातील खासदारांनी मला बोलता यावं म्हणून मदत केली त्यांचे आभार मानतो. नुसतं जयजयकार करुन चालणार नाही. मराठा समाज पुढारलेला आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. हा समाज मागासलेले नाही असं म्हणत आरक्षण रद्द केले. त्यामुळे पुढे काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. ५८ मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाने आरक्षणाबद्दल त्यांची भावना व्यक्त केली. नांदेडमध्ये इतक्या मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. लोकं बोलले, आम्ही बोलले आता लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे. फक्त बोलून नव्हे कृतीतून दाखवायला हवे. स्वराज्य हे फक्त मराठ्यांसाठी नाही अठरापगड जाती १२ बलुतेदारांसाठी निर्माण केले. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. ओबीसीला आरक्षण देताना मराठा समाजाचा समावेश करण्यात आला. मग गरीब मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार? आपला आवाज दिल्लीत उठायला हवाय असं संभाजीराजेंनी सांगितले.

तसेच राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर ढकलत आहे. आम्हाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावं हीच अपेक्षा. सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली त्याचा कुठला पाठपुरावा केला आहे? केंद्राने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवावी अशी राज्य सरकार मागणी करतंय. परंतु पहिल्यांदा राज्य सरकारने जबाबदारी घेऊन मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक मागासलेले पण सिद्ध करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्राने घटना दुरुस्ती करुन ५० टक्क्यांवर आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजाच्या वतीने मी पुढे येतो तुम्हीही आमनेसामने या होऊन जाऊ दे चर्चा असं मी म्हणतोय पण कुणीही येत नाही अशी टीकाही छत्रपती संभाजीराजेंनी राजकीय नेत्यांवर केली.

दरम्यान, अशोक चव्हाणांना संभाजीराजेंना भेटायला वेळ नव्हता. दिल्लीत आले शिवसेना, काँग्रेस नेत्यांना भेटले. पण समाजाला दिशाहिन करणं चालणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला १५ पानी पत्र पाठवलं. या पत्रातही खूप तफावती आहे. १५ पानी पत्र पाठवायचं होतं मग पहिलं मूक आंदोलन कोल्हापूरला झालं, नाशिकला झालं, आमदार आले, मंत्री आले. मला मुख्यमंत्र्यांचे पत्र पटत नाही. १५ जुलैला सरकारचा एक जीआर निघाला. ज्यांच्या नियुक्त्या २०१४ पासून झालेत त्यांना पुन्हा कामावर घ्या. त्यावर लोकं खुश झाले. परंतु जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी कुठे आहे? असा सवाल अधिकाऱ्यांनी केला. मग जीआर काढण्याला अर्थ काय? असा संतप्त सवालही संभाजीराजेंनी उपस्थित केला.    

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण