शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आणखी किती दिवस चर्चा करायची, अन्याय सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 10:56 IST

तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला.

बीड - Manoj Jarange Patil on Maratha Reservation ( Marathi News ) चर्चेतून मार्ग निघतो,पण आम्ही थांबणार नाही. तुम्ही चर्चेत गुंतवून आम्हाला पुढे पुढे ढकलत राहणार हे चालणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हवं आहे. सरकारसोबत आजही चर्चा सुरू आहे. वेळ देणार नाही. तुमचे शब्द होते, तुम्ही पूर्ण केला नाही. आम्ही कधीही चर्चेला आलेल्या परत पाठवले नाही.तुमचा सन्मानच केला. तुम्ही ३० दिवस मागितले आम्ही ४० दिवस दिले. चर्चेत गुंतवून ठेवायचे आणि विषय भरकटवायचा हे होणार नाही अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेपूर्वी दिला आहे. 

बीडमध्ये जरांगे पाटलांची निर्णयाक सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिली होती.परंतु आजही यावर ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आज बीडच्या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी पत्रकारांशी जरांगेंनी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला किती दिवस तुम्ही झुलवत ठेवणार? आमच्या संयमाचा अंत पाहिला जातोय. तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? सुरुवातीला ३ महिने, त्यानंतर ४० दिवस दिले तरी पुढे काय झाले? अजूनही आज आणि उद्याचा दिवस आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही कायद्याच्या चौकटीतच आरक्षण मागतोय, आम्ही मागास सिद्ध झालोय, ५४ लाख नोंदी सापडलेत. मग हे कायद्यात बसलेत ना..किती दिवस समाजाला येड्यात काढणार आहात? मराठ्यांनी किती दिवस अन्याय सहन करायचा हे आम्ही चालू देणार नाही. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणारच. इच्छाशक्ती असली की एका दिवसात आरक्षण मिळेल. एकाचे ऐकून तुम्ही मराठ्यांवर अन्याय करताय. पुढील काळात मराठे कसे आरक्षण घेतात हे तुम्ही पाहा. मराठ्यांनी ज्याला मोठे केले, त्याच्या डोक्यात किडे भरले आहेत. विष ओकायला लागलेत. ही किती गटारगंगा होती हे मराठ्यांना लक्षात आले. कुजकं बोलतो का? माझ्या नादी लागू नको. शहाणा हो असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे. 

दरम्यान, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, वारंवार चर्चा केली जातेय. तेच तेच सुरू आहे. सरकारने माझ्याशी संपर्क केला, बोलणं सुरू आहे. पण किती दिवस चर्चा करणार? संयमांचा अंत किती बघणार? प्रत्येकवेळी मराठ्यांनी शब्द पाळायचा. आम्हालाही काही मर्यादा आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलणे नाही, गिरीश महाजनांचा फोन आला होता. कायद्याच्या चौकट सरकारच्या दृष्टीने वेगळी आहे का? लोक हुशार झालेत. आम्हाला आरक्षण हवं आणि आम्ही ते घेणारच. मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून सरकार चाललंय असा आरोप जरांगे पाटील यांनी सरकावर केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती