शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी

By नामदेव मोरे | Updated: September 1, 2025 11:01 IST

आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये तरुणांसोबत साठी, सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.

नामदेव मोरे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये तरुणांसोबत साठी, सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने ज्येष्ठ आंदोलक लढ्यात सहभागी झाली आहेत. शेतात कष्ट करण्यात आयुष्य गेले, भावी पिढ्यांचे भवितव्य चांगले व्हावे, यासाठी लढत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. 

आमचे वाडवडील शेतात राबले, आम्हीही राबलो, मुलेही राबत आहेत. नातवंडे शिकली, पदवीधर झाली; पण नोकऱ्या मिळेना. विद्वत्ता असूनही नोकरी नाही, यामुळे पुन्हा ढेकळं फोडणंच नशिबी आले आहे. आता तरी न्याय मिळावा, अशा प्रतिक्रिया आंदोलक ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. 

‘आरक्षणाला  गणराया पावावाघरात गणेशोत्सव सुरू आहे; सण-उत्सवाच्या काळात आम्ही मुंबईत आलो आहे. आरक्षणाला गणराया पावावा, ही अपेक्षा आहे. कितीही पाऊस पडला, संकटे आली तरी आम्ही माघारी फिरणार नाही, असा निर्धार ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे.  

निकराच्या लढ्यासाठी मुंबईत झाले दाखलजालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीडसह मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यांतून शेकडो ज्येष्ठ नागरिक आरक्षणाच्या निकराच्या लढ्यासाठी मुंबई, नवी मुंबईत दाखल झाले आहेत.

गावी ‘एक गाव एक गणपती’ असतो. घरात गौराईही आली आहे. घरी सण असला तरी भावी पिढीच्या भवितव्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी झालो आहोत.बाळासाहेब कदम, ज्येष्ठ नागरिक, माजलगाव-बीड

आरक्षणामुळे भावी पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित होईल. यामुळे आंदोलनात सहभागी झालो आहोत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत गावी जाणार नाही.देवीदास सवंडकर (वय ७०), हिंगोली 

गावी गणेशोत्सव आहे, गौराई बसविल्याचा फोन आला होता. सण-उत्सव असतानाही लेकरांच्या हितासाठी आंदोलनात आलो आहे.दिंगबर सवंडकर (वय ६५), टेंभुर्णी, हिंगोली

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMumbaiमुंबई