शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांनी पाळला शब्द; वर्षाच्या आतच मराठा आरक्षणाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 19:12 IST

मराठा समाजाने २५ जुलै २०१८ रोजी मराठा क्रांती मोर्चा आंदोलन मागे घेतले होते. आंदोलन मागे घेण्यास एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले.

मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवले आहे. या ऐतिहासिक निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक युवकांनी गेल्या वर्षी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला होता. तसेच त्याला हिंसक वळण लागले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभराच्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २५ जुलै २०१८ रोजी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्याला एक वर्ष पूर्ण होण्यासाठी अवधी शिल्लक असून त्याआधीच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला आहे.

मागील २५ वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येत होती. २००८-०९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख मराठा आरक्षणासाठी सकारात्मक होते. त्यानंतर सर्वच पक्षांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळाला होता. तर २०१४ मध्ये नारायण राणे समितीने अहवाल सादर करून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या सूनचा केल्या होत्या. त्यानुसार काँग्रेसप्रणित आघाडीने मराठा समाजाला नोकऱ्या आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण दिले होते. परंतु, ते आरक्षण न्यायालयात टिकू शकले नव्हते.

२०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, सत्तेत आल्यानंतरही तीन वर्षे काहीच हालचाली झाल्या नसल्याने मराठा समाजाचा भावनेचा उद्रेक झाला होता. त्यातच नगर जिल्ह्यातील मराठा समाजातील मुलीवर सामूहिक बलात्काराची घडना घडली.त्यामुळे मराठा समाजाकडून औरंगाबादेत मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. औरंगाबादेतील मोर्चानंतर राज्यभरात या मोर्चाचे लोण पसरले. त्यानंतर राज्यभरात तब्बल ५८ मोर्चे काढण्यात आले. शांततेने काढण्यात आलेल्या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. त्यामुळे सरकारवर त्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता.

दरम्यान न्यायालयातून निकाल लागत नसल्याने २०१८ मध्ये मराठा समाज आक्रमक झाला होता. तसेच मोर्चाला हिंसक वळण लागले होते. त्यावेळी राज्य सरकारकडून निवडणुकीपूर्वी आणि एक वर्षाच्या आत आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे मराठा समाजाने २५ जुलै २०१८ रोजी मराठा क्रांती मोर्चा आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाची बाजू चांगल्या प्रकारे न्यायालयात मांडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. अखेरीस त्याला यश आले असून आंदोलन मागे घेण्यास एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मराठा समाजाचे आरक्षण वैध ठरले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला अशी भावना व्यक्त होत आहे.