शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 06:13 IST

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून महिनाभरात सर्व वैधानिक प्रक्रिया पार पाडली जाईल, तसेच आंदोलकांवरील साधे गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून महिनाभरात सर्व वैधानिक प्रक्रिया पार पाडली जाईल, तसेच आंदोलकांवरील साधे गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या काही संघटनांसोबत चर्चा केली. या वेळी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, विविध संघटनांचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून, मराठा समाजाच्या भावना आणि सूचनांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. मागासवर्गीय आयोगाने लवकरात लवकर आपला अहवाल द्यावा, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. आयोग स्वायत्त असल्याने त्याला आदेश देता येत नाहीत. परंतु, उच्च न्यायालयानेही आयोगाला अहवालाबाबतचे वेळापत्रक स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यानुसार अहवाल मिळताच आरक्षणाबाबतच्या सर्व वैधानिक बाबी तपासून त्याबाबत विशेष अधिवेशनात आरक्षणावर निर्णय घेतला जाईल.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या सर्व आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, पोलिसांना मारहाण, त्यांच्यावर हल्ला अथवा एसटी बस आदींची जाळपोळ अशा घटनांतील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. पोलिसांबाबत तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मेगाभरतीदरम्यान मराठा समाजातील तरूणांवर कदापि अन्याय होऊ देणार नाही. सर्व बाबींची पडताळणी करूनच भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.फूट पाडण्याचा हेतू नाहीमुख्यमंत्री म्हणाले की, अनेक लोक मराठा आंदोलन चालवित आहेत. हे सर्व समाजाच्या हितासाठी काम करत आहेत. हा प्रश्न सरकारलाही सोडवायचा आहे. फूट पाडणे, कोणाचा मान कमी करायचा- कुणाचा वाढवायचा, असल्या बाबींत सरकारला रस नाही. ज्यांना चर्चा हवी आहे, त्यांच्याशी आम्ही बोलत आहोत. सरकारला समन्वयातून प्रश्न सोडवायचा असल्याचे ते म्हणाले.आमदारांनी राजीनामे मागे घ्यावेतआरक्षणाचा निर्णय विधिमंडळात होणार आहे. अशा वेळी मराठा आरक्षणाच्या बाजूने मतदान करून आमदार मराठा समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू शकतील. राजीनामा देऊन ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे भावनेच्या भरात राजीनामा देत आमदारांनी ही संधी गमावू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस