शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातही मराठा आरक्षण टिकेल; मुख्यमंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 05:44 IST

मुख्यमंत्र्यांची लोकमतशी बातचीत; ऐतिहासिक निर्णयाने आनंदी

- यदु जोशी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील भव्य स्मारक आणि मराठा समाजाला आरक्षण हे आपल्या कारकीर्दीतील ऐतिहासिक निर्णय झाल्याने मी अतिशय आनंदी आहे, अशी भावना व्यक्त करतानाच, हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

मराठा आंदोलनाचा तुमच्यावर ताण होता का आणि मराठा आरक्षणाबाबत या काळात आपली नेमकी भावना काय होती, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, आंदोलन हिंसक झाले तेव्हा खूप व्यथित झालो होतो.

मराठा समाजाच्या भावना मी समजू शकत होतो. आरक्षण देण्याची प्रक्रिया, लागणारा कालावधी व ते टिकलेच पाहिजे यासाठी ठोस पावले उचलणे हेही महत्त्वाचे होते. गेल्या आॅगस्टमध्ये आंदोलनाला वेगळे वळण लागले, तेव्हा मी जाहीर केले होते की मी नोव्हेंबर २०१८ पूर्वी आरक्षण देणार आणि आज ते प्रत्यक्षात आले आहे.

हे आरक्षण न्यायालयात टिकेल या बाबत अनेक जण शंका उपस्थित करीत आहेत, याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनुसार संवैधानिक भूमिकेच्या आधारे आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यायालयातही मराठा आरक्षण टिकेल असा माझा विश्वास आहे.आरक्षण द्यायचेच ही भूमिका होतीआरक्षण द्यायचेच आहे ही भूमिका स्पष्ट आणि प्रामाणिक होती. एखाद्या समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल आवश्यक असतो. तो मराठा समाजाबाबत आतापर्यंत तयारच करून घेण्यात आला नव्हता. ते काम आमच्या सरकारने केले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस