शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

देशात जातीय विषमता राहू नये, जातीय जनगणना गरजेची नाही; RSS नं पंचसूत्री सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 12:45 IST

जातनिहाय जनगणनेची आवश्यकता नाही. जात जाहीर करण्याची आवश्यकता नाही असं आरएसएसनं म्हटलं.

नागपूर - राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा-ओबीसी संघर्ष सुरु असताना जातनिहाय गणना करावी अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. परंतु जातीय जणगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जातीय विषमता नष्ट करायची असेल तर जातगणना गरजेची नाही असं विधान RSS च्या विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी केले आहे. 

नागपूरच्या रेशीमबागेत हेडगेवार आणि गोळवळकर यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम झाला. त्याठिकाणी श्रीधर गाडगे म्हणाले की, सत्तेमध्येही आणि राजकीय क्षेत्र महत्त्वाचे आहे.त्यादृष्टीने आमदारांना मार्गदर्शन करताना पाच बिंदू मांडले.आपल्या देशात जातीय विषमता राहू नये. संपूर्ण देशातील जनता समरसतेने वागावी.देशातील कुटुंब पद्धतीचा पुन्हा विकास व्हावा. पर्यावरणाचे संतुलन लोकांनी ठेवावे. आत्मनिर्भर भारत व्हावा यासाठी आपले जे कर्तृत्व आहे ते केले पाहिजे. आपण नागरी तत्वाचे पालन करावे अशा पाच गोष्टी संघाने आमदारांसमोर ठेवल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच जातनिहाय जनगणनेची आवश्यकता नाही. जात जाहीर करण्याची आवश्यकता नाही. एकीकडे जातीचा उहापोह करणार, जात जनगणना करणार आणि दुसरीकडे जातीभेद नष्ट झाले पाहिजे असं म्हणायचे पण तसे होत नाही.जर जात विस्मरणात जातेय तर होऊ द्यावे. कारण जात कुणीही निर्माण करत नाही. जन्मापासून ती माणसाला मिळते. संघात जातीय व्यवस्था मांडली जात नाही. जातीचा विचार संघात केला जात नाही. त्यामुळे जातीनुसार जणगणना करणे हे काही सोयीचे नाही असं आम्हाला वाटते अशी प्रतिक्रिया आरएसएसचे श्रीधर गाडगे यांनी दिली आहे.

छगन भुजबळांनी केली जातीय जनगणनेची मागणीमराठा ५० टक्के आहेत की ओबीसी ५४ टक्के आहेत हे पाहण्यासाठी जातीय जनगणना होऊ जाऊद्या.जातगणना केली तर ओबीसी किती ते समजेल. कुठल्या समाजाची किती लोकसंख्या आहे ते कळेल. जातीजातीतील संघर्ष वाढतायेत. मनुष्य ही जात आहे ती धरून वागले पाहिजे परंतु वास्तविक व्यवहारात ते होत नाही. प्रत्येक ठिकाणी लोकसंख्या किती हा प्रश्न निर्माण होतोय असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.   

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaratha Reservationमराठा आरक्षण