शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाची नवी मुंबईत बैठक, आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत; व्यूहरचनेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 03:41 IST

गुजरातमधील पिछेहाटीनंतर भाजपा सरकारवर दबावतंत्र वापरण्यासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने २५ डिसेंबरला पनवेलच्या व्ही.के. हायस्कूलमध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.

मुंबई : गुजरातमधील पिछेहाटीनंतर भाजपा सरकारवर दबावतंत्र वापरण्यासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने २५ डिसेंबरला पनवेलच्या व्ही.के. हायस्कूलमध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.मुंबई महामोर्चावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणत्याही निर्णयावर प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झालेली नसल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे. परिणामी, सरकारला धारेवर धरण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याची चर्चा समाजामध्ये सुरू आहे. याच वेळेचा फायदा घेऊन मराठा क्रांती मोर्चाकडून तातडीने बैठकांचे आयोजन सुरू झाले आहे.नवी मुंबईतील बैठकीत राज्यभरातील समन्वयक उपस्थित राहतील, असा दावा विनोद साबळे यांनी केला आहे. साबळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीत सांगितले की, ९ आॅगस्ट २०१७ रोजी काढलेल्या महामोर्चातील किती आश्वासनांचे शासन निर्णय निघाले आणि इतर आश्वासनांची सद्य:स्थिती काय आहे, याचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. त्यानंतर सर्व समन्वयक चर्चेने पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील.एकंदरीतच पाटीदार समाजाने दिलेल्या झटक्यानंतर मराठा समाजानेही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दबाव गट निर्माण करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. विशेषत: पुढील अधिवेशनापर्यंत ठोस निर्णय हाती पाडण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून मोठ्या आंदोलनाची घोषणा होण्याची शक्यताही एका समन्वयकाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा