शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाचा केरळवासीयांना मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 20:17 IST

महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी सांगलीतून मराठा क्रांती मोर्चाचे चाळीस जणांचे एक पथक मंगळवारी २१ आॅगस्ट रोजी केरळला रवाना होत आहे.

 सांगली - महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी सांगलीतून मराठा क्रांती मोर्चाचे चाळीस जणांचे एक पथक मंगळवारी २१ आॅगस्ट रोजी केरळला रवाना होत आहे. आरोग्यापासून दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा केरळवासीयांना पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती मोर्चाचे डॉ. संजय पाटील आणि धनंजय वाघ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, माणुसकीचे नाते जपण्याचा हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घेतला. या निर्णयाचे स्वागत करताना जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी, याकामी मराठा क्रांती मोर्चास शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. केरळमधील एर्नाकुलम येथील १२ किलोमीटरच्या परिसरात सांगलीतील ही टीम काम करेल. या पथकात ६ डॉक्टर, पाच वैद्यकीय सहायक आणि अन्य स्वयंसेवक असणार आहेत. मंगळवारी दुपारी हे पथक आवश्यक सामग्रीसह त्याठिकाणी दाखल होईल. दरम्यान, केरळमध्ये आणखी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, याची माहिती या पथकातील स्वयंसेवक सांगलीत असलेल्या दुसºया पथकास देणार आहेत. त्यानंतर पुन्हा दुसरे पथक त्यांच्या मदतीसाठी जाईल. सध्या केरळमध्ये असलेले सांगलीतील गलाई बांधव आम्हाला आवश्यक सामग्रीची माहिती देत आहेत. त्यानुसार साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. मेडिकल असोसिएशनच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून घेतला आहे. लोकांचाही यात सहभाग व्हावा, म्हणून सोमवारी क्रांती मोर्चाने रॅली काढली. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीस सुरुवात झाली. एक मदतपेटी हाती घेऊन रॅलीतून लोकांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले. या रॅलीस सांगलीकरांनी प्रतिसाद दिला. मारुती रोड, कापडपेठ, टिळक चौक, गणपती मंदिर, टिळक चौक, राजवाडा चौकमार्गे ही रॅली स्टेशन चौकात आली. याठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली. संकलित झालेली मदत व अन्य साहित्य घेऊन आता स्वयंसेवकांचे पथक मंगळवारी केरळकडे रवाना होत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत भोसले, विजय खेतरे, रोहित शिंदे, अंकित पाटील आदी उपस्थित होते. सोलापूरहून चादरी, टॉवेलसोलापूर मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगलीतील या उपक्रमास सहकार्य म्हणून सोलापुरी चादरी आणि टॉवेल देण्यात आले आहेत. अन्य जिल्ह्यांतूनही मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मदत करू इच्छिणाºया सर्व लोकांनी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात वस्तू व आर्थिक मदत जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर