शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

‘मराठा क्रांती’ची पुन्हा मोर्चेबांधणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 06:19 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबई विभागातर्फे दादरच्या शिवाजी मंदिर येथील सभागृहात शुक्रवारी सायंकाळी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबई विभागातर्फे दादरच्या शिवाजी मंदिर येथील सभागृहात शुक्रवारी सायंकाळी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. त्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या फोर्ट येथील कार्यालयात १३ जुलै रोजी होणाऱ्या जनसुनावणीच्या तयारीबाबत मोर्चेबांधणी करण्यात आली.महामुंबई विभागाच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ९ आॅगस्ट २०१७ रोजी काढण्यात आलेल्या महामोर्चानंतर मुंबईत ही पहिलीच सभा झाली. सभेला मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. मराठा क्रांती मोर्चाद्वारे मांडलेल्या विविध मागण्यांची सद्य:स्थिती व मुंबईत होणाºया राज्य मागासवर्ग आयोगाच्या जनसुनावणीबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्य मागासवर्ग आयोगाच्या फोर्ट येथील बांधकाम भवनमध्ये १३ जुलैला ही जनसुनावणी पार पडणार आहे. जनसुनावणीत आयोगास सादर करायच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामुदायिक व इतर प्रकारच्या निवेदनाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संबंधित गोष्टींचा प्रचार, प्रसार कसा करता येईल? व सदरची निवेदने विविध घटकांकडून कशा प्रकारे जमा करायची? याविषयीची आखणीही बैठकीत करण्यात आली.कोपर्डी घटनेला १३ जुलै रोजी २ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने लाखो निवेदने जमा करून पुढील पिढीच्या भविष्याची तरतूद करून खºया अर्थाने कोपर्डी घटनेतील पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.दरम्यान, ‘राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजने’विषयी मराठा बांधवांच्या शंकांचेही या वेळी निरसन करण्यात आले. शुल्क सवलतीविषयी उद्भवणाºया अनेक समस्या सोडविण्यासाठी उपस्थितांमधून एका चमूचे गठन करण्यात आले. हा चमू सरकार दरबारी पाठपुरावा करेल.मदत केंद्रांची उभारणी करणारराजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व त्याच्या कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मदत केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई शहरात शिवडी, तर उपनगरात जोगेश्वरी या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या कामासाठी दोन समाजबांधवांनी वैयक्तिक जागा देण्याचे जाहीर केले. रविवारी या मदत केंद्रांचे उद्घाटन होईल.बैठकीत झालेले महत्त्वपूर्ण निर्णयमुंबई शहर व लगतच्या भागांतून माथाडी, डबेवाले, घरकाम, बिगारी कामगार व तत्सम अकुशल, असंघटित वर्गांमधील मराठ्यांकडून निवेदने गोळा करणे.समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या जी पिछेहाट झाली आहे, अशा दयनीय अवस्थेतून वेळीच बाहेर काढण्याच्या मदतीविषयी निवेदनातून विनवणी करणे.मुंबई शहरातील मराठा बांधवांच्या दैनंदिन समस्या व त्यांच्या बिकट अवस्थेचे सद्य:स्थितीदर्शक वर्णन निवेदनात करणे.‘राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना’ मराठा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार करणे.निवेदने जमा करण्यासंदर्भातही आखणीजनसुनावणी १३ जुलैला होणार आहे. यावेळी आयोगास वैयक्तिक, कौटुंबिक, सामुदायिक आदी निवेदने सादर करण्यात येतील. याबाबतचे मार्गदर्शन तसेच सदरची निवेदने विविध घटकांकडून कशा प्रकारे जमा करायची? याविषयीची आखणीही बैठकीत करण्यात आली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाnewsबातम्या