शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

‘मेपल’ साकारणार सामान्यांचे घर!

By admin | Updated: February 27, 2015 02:03 IST

वाढती महागाई आणि आकाशाला भिडणाऱ्या घरांच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न धुसर होत असतानाच ‘मेपल समूहा’ने पुण्यात केवळ १ ला

पुणे : वाढती महागाई आणि आकाशाला भिडणाऱ्या घरांच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न धुसर होत असतानाच ‘मेपल समूहा’ने पुण्यात केवळ १ लाखामध्ये हक्काचे घर, ही अभिनव योजना आणली आहे. या खास योजनेसाठी ‘मेपल’ने १ मार्च हा ‘इंडिया हौसिंग डे’ घोषित केला आहे.या योजनेमध्ये सुरूवातीला १ लाख रुपये भरायचे आहेत. यामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन खर्चाचाही समावेश आहे. ही रक्कम भरल्यावर ३ वर्षानंतर किंवा घर ताब्यात मिळाल्यानंतर ग्राहकांनी कर्जाचे हप्ते भरायचे आहेत. यासाठी ग्राहकांच्या वतीने ‘मेपल’ बँकेकडून कर्ज घेणार असून, पहिले ३ वर्षे किंवा घराचा ताबा ग्राहकांना देईपर्यंत ‘मेपल’ कर्जाचे हप्ते भरणार आहे.ग्राहकांनी १ मार्चपूर्वी घर बुक केल्यास ‘मेपल समूहा’तर्फे एलईडी दिवे, मोटार सायकल, मॉड्युलर किचन अशी खास बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच एक सोडत काढण्यात येणार असून त्यामध्ये एक सदनिका जिंकण्याची संधीही ग्राहकांना मिळू शकते. याशिवाय ३ वर्षानंतर हप्ते भरण्याची सुविधा आणि ४ लाख रूपयांचा अधिक फायदा मिळणार आहे. १ मार्चनंतर घर बुक केल्यास, मात्र हे फायदे मिळणार नाहीत; लगेच घराचे हप्ते सुरू होतील आणि मुख्य म्हणजे घरांच्या किमती १ लाख रुपयांनी वाढणार आहेत.‘मेपल समूहा’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन अगरवाल म्हणाले, स्वस्त घरे म्हणजे, निकृष्ट स्वरूपाचे बांधकाम हा गैरसमज होऊ शकतो. ‘मेपल’ बांधकामाचे इतरांना कंत्राट देत नाही, तर स्वत:च बांधकाम करीत असल्याने ते दर्जेदार असते. शिवाय ‘मेपल’ जागा मालकांबरोबर व्यवस्थित कायदेशीर करार करून, त्यांच्याबरोबरच संयुक्तपणे प्रकल्प उभा करते. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च अतिशय कमी होतो. त्यामुळे सर्वसामान्यांना किफायतशीर किमतीमध्ये दर्जेदार घर मिळू शकते.