मुंबई : राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी मनसेत प्रवेश केला आहे. कृष्णकुंज निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. तसेच जाधव आणि महाजन यांच्यासोबत नांदेडचे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कौटगे आणि माजी शहरप्रमुख सुहास दशरथे हेसुद्धा मनसेमध्ये डेरेदाखल झाले आहेत. मनसेत पक्षप्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे कधीच आयुष्यात खासदार होणार नाहीत, हे मी लिहून देतो. मी त्यांना आधी सुद्धा बोललो, आता तुमचं वय झालंय तुम्ही निवृत्ती घ्यावी. शिवसेनेचं नेतेपद मिळेल त्यावर खूश राहावं. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबाबाबत घाणेरडी वक्तव्य करणे सोडावं. त्यात त्यांची पातळी दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये मी थोडा भटकलो होतो, काही गैरसमज झाले होते, त्यातून आता माझी घरवापसी झाली.हिंदुत्वाचा पुरस्कार झाला पाहिजे. शिवसेना खऱ्या हिंदुत्वपासून दूर जात आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिक मनसेमध्ये येतील. रावसाहेब दानवेचा जावई मनसेमध्ये गेला म्हणजे आता मनसे आणि भाजप एकत्र येईल, असं कुणी समजू नये, असंही हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. दुसरीकडे प्रकाश महाजन यांनीसुद्धा एका वृत्तवाहिनीकडे भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत काम करावं, अशी इच्छा होती, मात्र मधील 10 वर्षाचा गॅप गेला. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली त्यानुसार त्यांना पाठिंबा द्यावा यासाठी मी पुन्हा राज ठाकरे सोबत आलो आहे, असंसुद्धा प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
अनेक शिवसैनिक लवकरच मनसेत येतील- हर्षवर्धन जाधव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 17:12 IST
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी मनसेत प्रवेश केला आहे.
अनेक शिवसैनिक लवकरच मनसेत येतील- हर्षवर्धन जाधव
ठळक मुद्देराज ठाकरे यांच्या उपस्थितीत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी मनसेत प्रवेश केला आहे. नांदेडचे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कौटगे आणि माजी शहरप्रमुख सुहास दशरथे हेसुद्धा मनसेमध्ये डेरेदाखल झाले आहेत.मनसेत पक्षप्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.