शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात करायचा का? तर चलो आर्वी! पापाचे खोदकाम सुरू असताना धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 06:59 IST

अनैतिक संबंध असो, प्रेमसंबंध की बलात्कार; गर्भपातासाठी विदर्भातून धाव

- नरेश डोंगरेनागपूर : अनैतिक संबंध असो, प्रेमसंबंध असो की,  कुणी कुणावर केलेला बलात्कार असो; त्यातून कुण्या महिला, मुलीला गर्भधारणा झाली आणि गर्भपात करायचा असेल तर नो टेन्शन ! ‘चलो आर्वी’, असे म्हणत ठिकठिकाणचे दोषी आर्वीकडे धाव घ्यायचे, अशी धक्कादायक माहिती काहीजण सांगत आहेत.राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या आर्वीतील डॉ. रेखा कदम आणि त्यांच्या साथीदाराच्या पापाचे खोदकाम पोलिसांनी सुरू केले आहे. ‘लोकमत’ने या संबंधाने विस्तृत माहिती प्रकाशित करून हे प्रकरण जनतेच्या न्यायालयात आणल्यामुळे आता पोलीस यंत्रणेसोबतच आरोग्य यंत्रणेचेही कान टवकारले. या पार्श्वभूमीवर, गोपनीयता बाळगून कसून तपास करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून पोलीस आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत. उघडपणे कोणी बोलायला तयार नाही. मात्र, वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रांतील मंडळींनी खासगीत बोलताना अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला आहे. त्यानुसार, कुणाच्या वासनेला बळी पडणाऱ्या पीडित महिला, मुलीचा गर्भपात डॉक्टर कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये बिनबोभाट केला जात होता. प्रेमसंबंध असो  किंवा अनैतिक संबंध ठेवणारे आरोपी महिला किंवा पीडित मुलीला गर्भधारणा झाल्यानंतर सरळ या हॉस्पिटलमध्ये पाठवत होते. तेथे डॉ. रेखा कदम आरोग्य यंत्रणेत असलेल्या काही मंडळींची साथ असल्याने संबंधित महिला, मुलीचा गर्भपात करीत होत्या. गर्भपातासाठी लागणारी औषधे आणि  इंजेक्शन सरकारी दवाखान्यातून कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचत होती. ‘लोकमत’च्या दणक्याने प्रशासनात खळबळया गर्भपात प्रकरणात ‘लोकमत’ने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या संशयास्पद भूमिकेवर बोट ठेवल्याने राज्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी वर्धा येथील आरोग्य विभागाचे चौकशी पथक आर्वीत दाखल झाले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने १२ जानेवारीला जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन करून चौकशीला सहकार्य करण्यासाठी विनंती केली. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सकांकडून रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी १३ जानेवारीला त्यांना एक पत्र पाठविले. शुक्रवारी ‘लोकमत’ने या प्रकरणाची पाळेमुळे खोदली. यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. वरिष्ठ पातळीवरून संबंधितांना विचारपूस सुरू झाल्यामुळे यंत्रणेने हालचाल सुरू केली.आडवळणाला गाव, म्हणून इकडे धावआर्वी हे खेडेवजा छोटे शहर वर्धा येथून सव्वा तासाच्या अंतरावर आहे. तेवढ्याच अंतरावर अमरावती शहरही आहे. आर्वीच्या तुलनेत वर्ध्यात चांगल्या सुविधा असलेली हॉस्पिटल्स आहेत. त्याहीपेक्षा अद्ययावत आरोग्य सुविधा अमरावती आणि नागपूरच्या हॉस्पिटल्समध्ये मिळतात. असे असताना आडवळणाला असलेल्या आर्वीमध्ये जाऊन गर्भपात करून घेणाऱ्यांची संख्या मोठी होती. महिन्याला ५ ते १०, तर वर्षभरात ७० ते १०० गर्भपात आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पिटलमध्ये होत होते, अशी माहिती पुढे येत आहे.सातवर्षीय मुलीला अंधत्वआर्वी : सातवर्षीय मुलगी आजोबासोबत वसंतनगर येथे दिवाळीसाठी आली होती. तिला ताप आल्याने डॉ. रेखा हिचे पती डॉ. कुमारसिंग कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, चुकीच्या पद्धतीने केलेल्या औषधोपचारामुळे मुलीच्या दोन्ही डोळ्यांंना पूर्ण अंधत्व आले. या प्रकरणी नागपूर खंडपीठाने डॉक्टर कदम यांनी चुकीचे औषधोपचार केले असा निर्णय देत २५ लाख रुपये दंड आणि ९ टक्के व्याजाची रक्कम तसेच आईला २० हजार रुपये भरपाईचा आदेश दिला.