- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - गणेशोत्सवापूर्वी मुलुंडला खड्डेमुक्त करा या मागणीसाठी मनसे कार्यकत्यांनी टि विभाग कार्यालयाबाहेर आरती करुन त्यांना जाग आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालिका कर्मचा-यांच्या भुवया उंचावल्या.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास या अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण आणि उपविभाग अध्यक्ष रांजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन पार पडले. मुलुंड मधील टी विभाग कार्यालयाबाहेर आरती आंदोलन केले. मुलुंड परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. बाप्पाच्या आगमनापूर्वी हे खड्डे बुजविण्याबाबत टी विभागाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही हे आरती आंदोलन केल्याचे चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यावेळी पालिका कर्मचाºयांनी दोन दिवसांची मुदत मागितली. आणि खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्याने मनसेने हे आंदोलन मागे घेतले.