शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

मंत्रालयात खंडणीखोर व्हायरस !

By admin | Updated: May 26, 2016 04:26 IST

जगभरात खंडणीखोरीसाठी कुख्यात असणाऱ्या लॉकी रॅन्समवेअर व्हायरसमुळे मंत्रालयातील सुमारे दीडशे संगणक निकामी झाले असून सगळी नेटवर्किंग सिस्टीम बंद पडली आहे.या व्हायरस

मुंबई : जगभरात खंडणीखोरीसाठी कुख्यात असणाऱ्या लॉकी रॅन्समवेअर व्हायरसमुळे मंत्रालयातील सुमारे दीडशे संगणक निकामी झाले असून सगळी नेटवर्किंग सिस्टीम बंद पडली आहे.या व्हायरस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना केवळ सरकारी ई-मेल आयडी वापरण्याचे निर्देश देण्यात आले असून जीमेल, याहू यासारख्या खासगी कंपन्यांचे ई-मेल आयडी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.गेल्या शुक्रवारी सर्वप्रथम या व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला. मंत्रालयातील संगणकांत सेव्ह केलेल्या फाइल उघडता येत नसल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली. प्रामुख्याने आॅफिस डॉक्युमेंट, पीपीटी फाइल ओपन होत नव्हत्या. प्रामुख्याने महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित संगणकांना या लॉकी व्हायरसची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आयटी विभागाने तत्काळ व्हायरस रोखण्याची कार्यवाही सुरू केली. मंत्रालयात सुमारे ५ हजार ३०० संगणक असून त्यापैकी व्हायरस शिरलेले संगणक शोधून ते वेगळे करण्यात आले. व्हायरस शिरलेले सुमारे १५० संगणक मंत्रालयाच्या मुख्य ‘लोकल एरिया कनेक्शन’ (लॅन) पासून वेगळे करण्यात आले. त्यानंतर खबरदारीचे उपाय म्हणून संगणकांमध्ये अँटी व्हायरस, सेफ्टी फायरवॉल उभारण्यात आले. लॉकी व्हायरस जगभर खंडणीखोरीसाठी कुख्यात आहे. स्पॅम मेल, पेन ड्राइव्हसारख्या पोर्टेबल डिव्हाइसच्या माध्यमातून तो संगणकात पोहोचविला जातो. एकदा हा व्हायरस संगणकात शिरला की तो त्या संगणकातील फाइल्स लॉक करून टाकतो. पासवर्डशिवाय हा लॉक उघडता येत नाही. त्यामुळे आपल्याच फाइल्स आपणास उघडणे अशक्य बनते. त्यानंतर संबंधित हॅकर्स या फाइल उघडण्यासाठी पासवर्डच्या बदल्यात खंडणीची मागणी करतात. सायबर विश्वातील अत्यंत महागड्या बिट्कॉईन या सायबर चलनातून ही खंडणी भरावी लागते. अमेरिका, जर्मनी आदी देशातील अनेक कंपन्यांना या लॉकीचा फटका बसला आहे. मोठी आर्थिक उलाढाल असणा-या कंपन्या, हॉस्पिटल्स्, शाळा-महाविद्यालये, संस्थांना लक्ष्य करण्यात येते. माहितीच्या बदल्यात खंडणी उकळली जाते. मंत्रालयीन कामकाजाशी संबंधित सर्व फाईल्स् राज्याच्या ‘डाटा सेंटर’मध्ये सेव्ह केली जातात. त्यामुळे लॉकी व्हायरसचा विशेष फटका बसला नाही. व्हायरस शिरलेल्या दिडशे संगणकाच्या हार्डडिस्कवर ज्या फाईल्स् होत्या त्या मात्र लॉकी व्हायरसमुळे बाधित झाल्याचे आयटी विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांनी सांगितले. खबरदारीचे उपायएकीकडे सरकार ‘डिजिटल इंडिया’चा डंका पिटत असताना व्हायरसच्या हल्ल्यात सरकारचीच यंत्रणा ठप्प झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी सरकारला खबरदारीचे उपाय योजावे लागतील, असे संगणक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.