शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

मंत्रालयात वर्षानुवर्षे पडून असलेली वाहने निकालात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:01 IST

- जमीर काझी मुंबई : मंत्री व सनदी अधिकाºयांच्या दिमतीसाठी लाखो रुपये खर्चून आणलेली मात्र नादुरुस्त झाल्याने मंत्रालयाच्या परिसरात कित्येक वर्षांपासून पडून असलेली वाहने हलविण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला. सुरक्षेच्या दृष्टीने ती त्वरित अन्यत्र स्थलांतरित करावीत, असा आदेश गृह विभागाने वाहनांची मालकी असलेल्या संबंधित विभागांना दिला.होंडा सिटी, फोर्ड, हुंदाई, मारुती एस्टिम आदी ...

- जमीर काझी मुंबई : मंत्री व सनदी अधिकाºयांच्या दिमतीसाठी लाखो रुपये खर्चून आणलेली मात्र नादुरुस्त झाल्याने मंत्रालयाच्या परिसरात कित्येक वर्षांपासून पडून असलेली वाहने हलविण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला. सुरक्षेच्या दृष्टीने ती त्वरित अन्यत्र स्थलांतरित करावीत, असा आदेश गृह विभागाने वाहनांची मालकी असलेल्या संबंधित विभागांना दिला.होंडा सिटी, फोर्ड, हुंदाई, मारुती एस्टिम आदी चार वाहने मंत्रालय परिसरात तर अन्य १६ वाहने प्रशासकीय भवन परिसरात पडून आहेत. या सर्व वाहनांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.राज्यातील प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात मंत्री, वरिष्ठ अधिकारी व अन्य अधिकाºयांना कार्यालयीन वापरासाठी शासकीय वाहन पुरविले जाते. त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित विभागाकडे असते. संबंधित विभागांनी नादुरुस्त वाहने दुरुस्त न करता अधिकाºयांसाठी नवीन वाहने खरेदी केली. त्यामुळे धूळखात पडलेल्या नादुरुस्त वाहनांचा गैरकृत्यासाठी वापर करून घातपात घडविला जाण्याची शक्यता असल्याचा सविस्तर अहवाल मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाने बनविला आहे. त्यामुळे ही वाहने सध्याच्या ठिकाणांवरून हलवून त्याबाबत पुढील कार्यवाही केली जावी, असा प्रस्ताव गृह विभागाकडे पंधरा दिवसांपूर्वीच पाठविण्यात आला होता. त्यानुसार ही वाहने तातडीने अन्यत्र हलविण्याचीसूचना गृह विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांना दिली आहे.लिलावातून विक्रीनादुरुस्त वाहने संबंधित विभागाकडून भांडारगृहाकडे पाठविली जातील. त्यानंतर जाहीर लिलावाद्वारे त्यांची विक्री करण्यात येऊ शकते. त्याबाबतचा निर्णय संबंधित विभागांकडून घेण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.