शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

...तर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील; संतोष देशमुख प्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:42 IST

Manoj Jarange Patil : बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड आणि बबन गित्ते गँगमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh Case: बीडच्या कारागृहात संतोष देशमुख प्रकरणाचा आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर हल्ला झाल्याची दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. काल सकाळच्या सुमारास कराड आणि बबन गित्ते गँगचा महादेव गिते एकमेकांना भिडल्याची माहिती आहे. या प्रकरणावर आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी गँगवॉरमध्ये एकमेकांनाच संपवतील, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले आणि अन्य आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. याशिवाय, आरोपी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून लवकरात लवकर आरोपींना फाशी द्या. जिल्हा प्रशासनातील सर्वांची बदली करून तिथे नवीन स्टाफ भरायला पाहिजे. त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

गृहमंत्री आरोपींना वाचवत आहेत...नुकताच बीड जिल्ह्यातील कळंब शहरातील एका घरात महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही करण्यात आला. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, गृहमंत्री जाणून-बुजून हे टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील कोण आरोपी आहेत? कोण पोलीस आहेत? आरोपींना फरार असताना पैसे पुरवणारे कोण आहेत? या सर्वांना सह आरोपी करा. पण ते करत नाही, कारण गृहमंत्र्यांनाच आरोपींना वाचवायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराड