शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

"पण बरेच झाले, लोकांचे डोळे उघडतात..."; 'लाडकी बहीण' योजनेवरून मनोज जरांगे यांचा सरकारवर निशाणा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:37 IST

"... पण, आता अशी एकही बहिण नसेल की, तिला घर नाही किंवा गाडी नाही म्हणून."

काय असते की, सरकार शेतकरी विरोधी आहे की नाही, हे शतकऱ्यांनी पाच वर्षांतच बघायला हवे. खरंच, गोरगरिबांनी एवढे भळभळायला नको आणि पलट्या मारून यांना नीट करायला हवे. आता त्या लाडक्या बहिणींचे नाही का, आधी सरसकट पैसे दिले आणि आता एकाएकीच म्हणताय अटी लावायच्या. तुझ्याकडे घर नाही पाहिजे, फोर व्हीलर नाही पाहिजे, आणखी काही बरंच आहे वाटतं. मला काही जास्त अटी माहीत नाहीत. पण, आता अशी एकही बहिण नसेल की, तिला घर नाही किंवा गाडी नाही म्हणून... आणि आधी नाही का जमलं? आधी बघायचे ना? आधी सरसकट वाढवून टाकले, आता मोकळे झाले. पण बरेच झाले, लोकांचे डोळे उघडतात. की हे वेळेवर किती फसवणूक करतात. जे करतंय ते चांगल्यासाठीच करतेय सरकार, लोकं हुशार व्हायला लागलेत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, "हे मागणी केल्याने काही काम करतात का?  जेथे त्यांचे हीत आहे, ते तिकडे बजेट टाकणार. कॉन्ट्रॅक्टरला टाकणार, कंपन्यांना टाकणार, त्यांच्या मित्रांना टाकणार. इकडे गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही करणार. संपूर्ण बिल माफी नाही करणार, आरक्षण हवे आहे, तेही नाही देणार. त्यांच्या हिशेबानेच अर्थसंकल्प असतो तो."

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आपली काही कर्जमाफीची मागणी आहे का? असे विचारले असता जरांगे म्हणाले, "असायला काय? मला काय कडू लागते का? पण देणार नाहीत ना हो. हे देणारच नाहीत. शेतकरी किती दिवसापासून संकटात आहेत? त्यांचे पीक विमे येत नाहीत. त्यांची नुकसान भरपाई येत नाही आणखी. त्यांचा हक्क त्यांना मिळत नाही, मालाला भाव वाढत नाही. हे सर्व शेतकऱ्यांना बघावेच लागणार आहे."

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBudgetअर्थसंकल्प 2024ladki bahin yojanaलाडकी बहीण योजना