शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:53 IST

Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीस यांना हिताचे सांगत आहे. मराठ्यांना डावलू नका. मागण्या मान्य केल्या नाही तर माझ्या नावाने बोंबलायचे नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News: हा दसरा मेळावा सगळ्यांचा आहे, सगळ्यांनी एकत्र या. कोणीही आडवे पडू नका. राज्यातील मराठ्यांची इच्छा होती की, दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटल मधून सुट्टी घेत आहे, कधी दसरा येतो, अशी खूप आशा लागली आहे. कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा आहे, असे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पुन्हा एकदा थेट शब्दांत इशारा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नवी विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात यायला हवी. महाराष्ट्रात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असे बोलले जात आहे. याच संदर्भात मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे.

...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल

दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्या, त्याला आम्ही काही करू शकत नाही. दसरा मेळावा घ्यायची  खूप दिवसाची इच्छा होती. आम्हाला पाडायचे नाही आणि उभेही करायचे नाही, पण बैठक होणार आहे. देवेंद्र फडवणीस आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्याला लोक येणार आहेत. भाजपामधील मराठ्यांनी पण हाच विचार करा आणि फडणवीसांना सांगा. निवडणूक लागण्याअगोदर मराठ्यांच्या मागण्यांचा विचार करा, नाहीतर फडणवीस यांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, लोकसभेच्या अगोदर सांगितले होते की, सरकार निवडणूक घेणार नाही. मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. नाहीतर माझा नाईलाज आहे. तुम्ही तुमच्या नेत्याला देवेंद्र फडणवीसांना समजावून सांगा. फडणवीस तुम्ही निवडणूक लागण्याआधी आमच्या मागण्या मान्य करा. तुमचे लोक आमच्याकडे येतात. मागण्या मान्य केल्या नाही तर माझ्या नावाने बोंबलायचे नाही. तुम्हाला शब्द आहे, मागण्या मान्य केल्या नाही तर तुमचा सुपडा साफ होईल. देवेंद्र फडणवीस यांना मी हिताचे सांग आहे. मराठ्यांना डावलू नका. जनता, मुस्लीम बांधव, बारा बलुतेदार म्हणतात की, मी मुख्यमंत्री व्हावे. पण, मी स्वार्थी नाही, समाज मोठा आहे. वेळ, मुहूर्त योग्य वेळी घडून येते आणि त्याचा फायदा मराठा, मुसलमान, बारा बलुतेदार यांनी घेतला पाहिजे. दसरा मेळाव्याला ऊन, वारा, पाऊस असला तरी या, असे जरांगे म्हणालेत.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण