शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 17:51 IST

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: आता घरी जाणार आहे. तिथे जाऊन रणनीती ठरवणार आहे. राज्याच्या पातळीवरचे काम आता सुरू करणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil Maratha Reservation News:मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा,  आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास उपोषण न करता विधानसभा निवडणुकीत उतरून तुमचे उमेदवार पाडू, असा इशाराही जरांगे  यांनी दिला. यातच आता शाहगड येथे कार्यालय सुरू करणार असून, कुठे असलो तरी आंदोलन सोडणार नाही, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आरक्षण ओबीसीत नाही तर कशातून द्यायचे? कुणाला धक्का लागत नाही. मात्र, काही लोक सांगत नाहीत. जवळपास सगळे मराठे अरक्षणात गेले, राहिलेल्या लोकांना सोबत घेतले पाहिजे. नाही तरी आम्ही घेणार, असे सांगत माझा चित्रपटात जीव नाही तर आरक्षणात आहे. चित्रपट तयार करणाऱ्यांना  शुभेच्छा. मला आता आठ दिवस उठता येणार नाही. चित्रपट नंतर पाहीन. चित्रपटात इंटरेस्ट नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

शाहगड येथे कार्यालय सुरू करणार

मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांची बैठक घेणार आहे. आता वेगाने कामाला लागणार आहोत. मुंबईत मोठ्या घडामोडी होणार आहेत. अन्याय करायचा प्रयत्न केला तर मागे हटणार नाही. माझ्यामुळे जर कोण निवडूण आले, असे म्हणत असेल तर त्यांचा मोठेपणा आहे. मी समाजासाठी लढत आहे. शाहगड येथे कार्यालय सुरू करणार आहे. अंतरवाली सोडायचा विषय नाही. अंतरवाली गावाचे उपकार मी कधीच विसरणार नाही. लोकांना त्रास होऊ नये. वर्दळ होईल म्हणून शाहगड येथे कार्यालय सुरू करणार आहे. राज्याच्या पातळीवरचे काम आता सुरू करणार आहे. मी आता घरी जाणार आहे. तिथे जाऊन रणनीती ठरवणार आहे. मी घरी, डोंगरात गेलो तरी आंदोलन सोडणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, सगेसोयरे अध्यादेश, गुन्हे मागे घेण्यासह मराठा आरक्षणाबाबत शासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली. मनोज जरांगे यांनी एक महिन्याचा वेळ देत उपोषण स्थगित केले. त्यानंतर मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण