शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:59 IST

Manoj Jarange Patil News: सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी बोलावलेली महाबैठक महत्त्वाची मानली जात आहे.

Manoj Jarange Patil News: राज्यातील गोर-गरीब मराठा समाजातील लेकरांच्या हितासाठी, भविष्यासाठी ही शेवटची अंतरवाली सराटीतील बैठक होणार आहे. उद्या अंतिम निर्णायक बैठक होईल. उद्या दिशा ठरवली जाणार आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत जायचे आहे, मराठा समाजाच्या मागण्या, आतापर्यंत काय मिळाले आणि आता आपल्याला काय मिळवायचे आहे, याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे उद्या दुपारी १२ वाजता या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी बोलावलेली महाबैठक महत्त्वाची मानली जात आहे.

अंतरवाली सराटीत उद्या मराठा समाजाची महाबैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. घराघरातील मराठा समाज इथे प्रत्यक्ष येणार आहे. फेसबुक, सोशल मिडिया, व्हॉट्स अ‍ॅप यावर घरी बसून बघण्यापेक्षा आपण सगळ्यांनी उद्या १२ वाजता अंतरवालीत या. कारण आपल्याला प्रत्यक्ष चर्चा करायची आहे. आपली एकजूट दिसली पाहिजे. घरी बसून आपली एकजूट दिसत नाही. आपल्या लेकरा-बाळांच्या आयुष्याचा प्रश्न जर मार्गी लावायचा असेल, तर आपली सगळी कामे बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठ्यांनी यावे. इथे आल्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. सगळ्या गोष्टी सोशल मिडिया आणि मीडियाच्या माध्यमातून सांगता येत नाही. खूप महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

बैठकीचा मुख्य अजेंडा काय?

कोणत्या विषयावर ठराव करून, त्यावर ठाम निर्णय घ्यायचे आहेत, यावर बैठकीत चर्चा होणार आहे. समाज शेवटी एकजूट राहायला पाहिजे. समाजाला आपल्याला उंचीवर न्यायचे आहे. समाज खाली राहता कामा नये. त्यासाठी प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहून आपण आपली एकजूट दाखवायची आणि आपल्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करून घ्यायची. समाज मोठा करणे, लेकरं-बाळं मोठी करणे, हाच मुख्य या बैठकीचा अजेंडा आहे. आपली लेकरे खुर्चीवर बसली पाहिजेत, ते अधिकारी झाले पाहिजे, मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबला पाहिजे, मराठा समाजाच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

दरम्यान, आता विजय मिळवायचा आहे. सगळेच आता सांगून योग्य होणार नाही. माझा आणि माझ्या समाजाचा काय उद्देश आहे, बैठकीचे मुख्य धोरण काय आहे. आपल्याला काय करायचे आहे आणि काय मिळवायचे आहे, हे उद्या सविस्तर मराठा समाजाला सांगणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या समाजाच्या समोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील आता नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता राज्यातील जनतेचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण