शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंची मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा; मुख्यमंत्री म्हणाले, "कुणीही घाईगडबडीने निर्णय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 19:26 IST

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्याबाबत मोठी घोषणा केली आहे.

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये 'निर्णायक इशारा सभा' पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्याबाबत मोठी घोषणा केली आहे. २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे. मला भेटण्यासाठी राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत. त्यांना आडवून दाखवा असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करताना संयम बाळगावा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांना केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आताच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाला आहे, क्युरेटिव्ह पिटीशन २४ जानेवारीला न्यायालय ऐकणार आहे. आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी हा फार मोठा दिलासादायक निर्णय आहे. मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी वकीलांची फौज सरकारची बाजू न्यायालयात मांडेल. सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर कऱण्याचे काम वकिलांची फौज करेल. यातून मराठा समाजाला न्याय मिळेल. तोपर्यंत सर्वांनी संयम राखणं महत्वाचे आहे."

याचबरोबर, "राज्यात कायदा सुव्यवस्थता, शांतता राहिली पाहिजे. सर्व जाती धर्मांना माझं आवाहन आहे की, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल. क्युरेटिव्ह पीटिशन ऐकली जाणं ही जमेची बाब आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे, सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांना वाटतं मराठा आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे कुणीही घाईगडबडीने निर्णय घेऊ नये. संयम बाळगावा," असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यासह मराठा समाजाला केले आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?आरक्षणासाठी सरकारने सुरूवातीला तीन महिने, ४० दिवस नंतर आता २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला. परंतू काहीच निर्णय घेतला नाही. मग आम्ही कुठपर्यंत थांबणार? आम्हालाही मर्यादा आहेत. परंतू आता सहनशिलता संपली आहे. त्यामुळे तयारीला लागा. २० जानेवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे. मला भेटायला राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत, त्यांना अडवून दाखवा? असे म्हणत सरकाला इशारा दिला आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघारी येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षण