शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

“PM मोदींना सत्तेसाठी छत्रपती शिवराय लागतात, पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 13:04 IST

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली.

Manoj Jarange Patil News: पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात. परंतु, अद्यापपर्यंत अरबी समुद्रात स्मारक झालेले नाही.  छत्रपतींचा महानाट्य दाखवले म्हणजे गुन्हा केला का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचा आयोजन केले होते. यासाठी नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिला प्रकरणे पुण्यातच जरांगेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे यांनी टीकास्त्र सोडले.

ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी तसेच अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले होते. परंतु, मनोज जरांगे यांनी एक उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ ऑगस्टपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

सांस्कृतिक मंत्रालयाला ते पैसा भरता येत नाही का? 

सत्ता आणायला मोदींना छत्रपतींचा आधार लागतो आणि समुद्रातच स्मारक होत नाही. भूमिपूजन करायला जमते. छत्रपतींचा इतिहास दाखवला तर सांस्कृतिक मंत्रालयाला ते पैसा भरता येत नाही का? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली. तसेच छत्रपती अडचणीत आणण्याची परंपरा फडणवीस जपत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

दरम्यान, हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात एवढ्या नीचपणाने सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? पुन्हा अटक वॉरंट का काढले? न्याय, गृह विभाग फडवणीस यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे. न्यायाधीश हे फडवणीस यांचे नातेवाईक आहेत. मला जेलमध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते. मी कुठेच अडकत नाही, म्हणून हा कट आहे. पैसे दिले होते, त्या मॅटरमध्ये माझा चेक नाही. आम्ही सन्मान करतो म्हणून हुकूमशाही करता का, मी काय दहशतवादी आहे काय, अशी सवाल जरांगे यांनी केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज