मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावाने बनावट लेटरहेड तयार करून त्यावर स्कॅन केलेल्या सह्यांच्या आधारे विधान भवनाचे पास बनविण्यात आले. विधिमंडळातील काही कर्मचाऱ्यांनी बनावट पत्रे तयार केली व त्याआधारे पास बनवून दोन ते पाच हजार रुपयांना विकल्याचा आरोप राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधान परिषदेत केला.
मंत्री सामंत यांनी ही धक्कादायक बाब सभागृहाच्या निदर्शनास आणली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बनावट लेटरहेडवर विभागातील सुमारे ५० जणांची नावे व पदे नमूद करण्यात आली. त्याखाली सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बनावट सही करण्यात आली. स्कॅन केलेल्या सह्या वापरून विधान भवनाचे पास मिळवण्यात आले. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्याची सीएमओकडून चौकशी करण्यात आली. त्यावेळी एमआयडीसीसह मंत्रालयातील इतर विभागांच्या नावानेही अशा प्रकारची पत्रे बनवल्याचे समोर आले.
पहिलीच व शेवटची चूक झाल्याची कबुलीविधिमंडळात याचा तपास सुरू असताना काही कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून ही पहिलीच व शेवटची चूक झाल्याची कबुली दिली आहे. पण शेवटची चूक आहे असे समजून त्यांना माफ केले तर चुकीचा पायंडा पडेल.
अशा दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. सभागृहात हा मुद्दा चर्चेला येण्यापूर्वीच संबंधित विभागाचा मंत्री म्हणून ही बाब निदर्शनास आणून देत असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी ही बाब विधिमंडळाच्या निदर्शनास आली असून, प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
Web Summary : Minister Uday Samant alleges Maharashtra Assembly staff involvement in forging passes. Passes, created using fake letterheads and signatures, were sold for ₹4,000. An investigation is underway, promising strict action before the session ends.
Web Summary : मंत्री उदय सामंत ने महाराष्ट्र विधानसभा कर्मचारियों पर जाली पास बनाने में शामिल होने का आरोप लगाया। नकली लेटरहेड और हस्ताक्षरों का उपयोग करके बनाए गए पास ₹4,000 में बेचे गए। जांच चल रही है, सत्र समाप्त होने से पहले सख्त कार्रवाई का वादा किया गया है।