शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:20 IST

Manikrao Kokate News: सदनिका घोटाळ्या प्रकरणी झालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज रुग्णालयातून बाहेर येत जामिनासाठी न्यायालयात हजेरी लावली.

सदनिका घोटाळ्या प्रकरणी झालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज रुग्णालयातून बाहेर येत जामिनासाठी न्यायालयात हजेरी लावली. यावेळी त्यांना शिक्षा आणि मंत्रिपदाबाबत विचारले असता, 'काय बोलायचं ते माझ्या वकिलांशी बोला' असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. 

१९९५ साली  झालेल्या सदनिका घोटाळ्याप्रकरणी नाशिकमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेब्रवारीत महिन्यात माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती.

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर पोलिसांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र कोकाटे हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. तसेच त्यांनी शिक्षेपासून दिलासा मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करत कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर जामिन अर्जावर सही करण्यासाठी माणिकराव कोकाटे आज रुग्णालयामधून थेट न्यायालयात दाखल झाले होते. तिथे या सर्व घटनाक्रमाबाबत विचारले असता.  'काय बोलायचं ते माझ्या वकिलांशी बोला. मला आराम करू द्या. मला काही नको आहे', अशी प्रतिक्रिया दिली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Manikrao Kokate visits court after hospital discharge, addresses sentence.

Web Summary : After the Supreme Court suspended his sentence in a housing scam, Manikrao Kokate appeared in court for bail after leaving the hospital. He directed questions about his sentence and ministerial position to his lawyer, stating he needed rest.
टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेCourtन्यायालयNashikनाशिक