शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

माणगाव-भादाव पूल मोडकळीस

By admin | Updated: July 11, 2017 03:44 IST

माणगाव काळ नदीवर वसलेला भादावचा पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल १९७० मध्ये काळ प्रकल्पाने बांधला.

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव काळ नदीवर वसलेला भादावचा पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल १९७० मध्ये काळ प्रकल्पाने बांधला. जवळपास ४६ वर्षांहून अधिक काळ झाला असून या पुलाचे कठडे तुटून पूल मोडकळीस आला आहे. या पुलाकडे काळ प्रकल्प खात्याने त्वरित लक्ष देऊन नव्याने बांधावा, अशी मागणी भादाव ग्रामस्थांनी केली आहे.या पुलाची आयुमर्यादा आता संपली असून तो पूल पूर्णपणे मोडकळीस आला आहे. या पुलाची अवस्था गंभीर बनली असून केव्हाही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या पुलाला चिरा-भेगा पडलेल्या असून पुलाला गळती लागली आहे. या पुलावरून केवळ दुचाकी वाहनांना जाण्यासाठी परवानगी असून तीन किंवा चारचाकी वाहनांना जाण्यासाठी बंदी आहे. हा पूल मजबूत किंवा नवीन झाल्यास भादाव ग्रामस्थांना व माणगावकरांना सोयीचे ठरणार आहे. हा पूल नव्याने बांधल्यास भादाव ग्रामस्थांचा तीन कि.मी. अंतर कमी होणार आहे. शिवाय ग्रामस्थांचा पैसा व वेळ वाचून शालेय विद्यार्थ्यांनाही ते खास सोयीचे ठरणार आहे. हा पूल कमकुवत झाला असल्याने सद्यस्थितीत भीतीचे वातावरण असून पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे. जीव मुठीत धरून ग्रामस्थ या पुलावरून प्रवास करीत आहेत.काळ प्रकल्प खात्याने अंदाजपत्रक तयार केलेले आहे. मात्र अद्याप निधीअभावी काम सुरू झाले नाही. आज या पुलाची अवस्था अत्यंत गंभीर बनली असून या पुलाकडे काळ प्रकल्प खात्याने लक्ष देऊन हा पूल मजबूत अथवा नव्याने करावा, अशी मागणी भादाव ग्रामस्थांनी केली आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी न लागल्यास काळ प्रकल्प खात्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.काळ प्रकल्पाअंतर्गत हा पूल येत असून सध्या या पुलाची अवस्था बिकट आहे. या पूल दुरु स्तीचे अंदाजपत्रक वरील कार्यालयात मान्यतेसाठी पाठविले आहे. तसेच आमचे ठाणे येथील अधीक्षक अभियंता लोहार यांनाही या पुलाची माहिती दिली असून येथे भेट सुद्धा दिली आहे. लवकर प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर पुलाचे काम सुरू होईल. - श्वेता पाटील, सहा.कार्यकारी अभियंता, काळ प्रकल्प माणगाव