मंगळसूत्र खेचणारी इराणी टोळीच्या सूत्रधार महिलेस अटक

By Admin | Updated: June 3, 2014 22:35 IST2014-06-03T21:18:59+5:302014-06-03T22:35:39+5:30

सोनसाखळी चोरी करणार्‍या फिजा शेख या इराणी टोळीच्या महिला सूत्रधारास ठाणे शहर गुन्हे शाखेने सापळा रचून आंबिवली येथून अटक केली आहे.

Mangalasutra Irani gang styled woman arrested | मंगळसूत्र खेचणारी इराणी टोळीच्या सूत्रधार महिलेस अटक

मंगळसूत्र खेचणारी इराणी टोळीच्या सूत्रधार महिलेस अटक

ठाणे : पायी चालणार्‍या एकट्या महिलांवर लक्ष ठेवून, त्याची माहिती आपल्या भावांसह इतर साथीदारांना मोबाइलद्वारे देऊन, सोनसाखळी चोरी करणार्‍या फिजा शेख या इराणी टोळीच्या महिला सूत्रधारास ठाणे शहर गुन्हे शाखेने सापळा रचून आंबिवली येथून अटक केली आहे. तिच्याकडून १५ लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. तिचे दोन भाऊ आणि इतर साथीदार अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
एप्रिलमध्ये फिजाने साथीदारांसह कळव्यातील एका महिलेच्या गळ्यातून चेन चोरली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेने हाती घेतला आणि त्यानुसार कल्याण, आंबिवली येथील तिच्या घराची झडती घेतली असता, तिच्या घरात कळव्यातील गुन्‘ातील चोरून नेलेल्या दागिन्यांपैकी ३७ हजार ५०० रुपयांची सोन्याची चेन आढळली. त्यानुसार तिची अधिक चौकशी केली असता, तिने २७ गुन्‘ांची कबुली दिली. तिच्याकडून पोलिसांनी ६६४ ग्रॅम वजनाचे १५ लाख ३० हजार ५०० रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणातील तिचे भाऊ सादिक अली हुसेन, मेहंदी हुसेन आणि इतर साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Mangalasutra Irani gang styled woman arrested