शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! नाचताना झालेल्या वादातून दोन दारूड्यांनी केली एकाचा हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 19:22 IST

दारू पिऊन नाचत असताना झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रेमचंद गजरे (वय ४१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कल्याण, दि. 16- दारू पिऊन नाचत असताना झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रेमचंद गजरे (वय ४१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून अन्य तीन जण फरार आहेत. याप्रकरणी अक्षय आरोलकर (वय 22) आणि भावेश पाटीलला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अन्य ३ साथीदारांचा शोध सुरू आहे. यासंदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.डी.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री मृच गजरे हा त्याचा मित्र गौरव भोसलेसमवेत एका बारमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी दारु पिऊन नाचत असताना दुस-या ग्रुपमधील मद्यपिंना धक्का लागला. त्यात ग्लासमधील दारू सांडली, या रागातून वादावादी झाली. ते भांडण बारचालक- कर्मचा-याने सोडवले. त्यानंतर बराच वेळ गेला, पण तरीही त्याचा राग धरुन बारमधून बाहेर आल्यावर पाच जणांनी गजरे आणि भोसलेला पुन्हा मारहाण केली. यावेळी त्यांच्यावर चाकूनं वार करण्यात आल्याने गजरे व भोसले जखमी झाले.  या हल्यात गंभीर जखमी झालेला गजरेला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गजरे याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असून तो बांधकाम व्यावसायिक होता.   हाणामारी-चाकू हल्ला झाल्याची घटना जरी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली नसली तरीही बारमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या फुटेजवरुन अन्य तिघांचा शोध सुरु करण्यात आला आहे. 

टॅग्स :Murderखून