शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली! शरद पवार यांची मिश्कील खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 02:57 IST

माझ्या आईवर कोल्हापूरची माती, पाणी आणि माणसांचा संस्कार होता. तेच संस्कार आम्हा भावंडांना तिने दिले. आईवर शाहू महाराज, फुले दाम्पत्य, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता.

कोल्हापूर : मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी मिश्कील खंत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावास भेट दिल्यानंतर व्यक्त केली. व्यग्र कार्यक्रमातूनही त्यांनी येथे आवर्जून भेट देत आठवणींना उजाळा दिला. गावानेही गुढ्या उभारून व दारासमोर रांगोळी, फुलांचा सडा घालून त्यांचे आपुलकीने स्वागत केले.मामाचे गाव किंवा आजोळ म्हटले की, माणूस हळवा होतो. शरद पवारही त्याला अपवाद कसे ठरतील! त्यांच्या भेटीने या ८०० लोकवस्तीच्या गावामध्ये चैतन्य संचारले. स्वागतासाठी सारा गाव एकवटला. पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांचा जन्म गोलिवडेतील भोसले कुटुंबामध्ये झाला. काही वर्षांनी त्यांचे कुटुंब कोल्हापूरला वास्तव्यास गेले.‘माझी एक तक्रार आहे, तिचा आता काही उपयोग नाही; पण मामाच्या गावची पोरगी करायची पद्धत आपल्याकडे आहे. मात्र तेव्हा तुम्हीही कुणी काही विचारलं नाही आणि माझ्याही ते लक्षात आलं नाही. आता लग्न होऊन ५० वर्षे झाली. आता बोलून काही उपयोग नाही...’, पवारांच्या या विधानावर जोरदार खसखस पिकली.माझ्या आईवर कोल्हापूरची माती, पाणी आणि माणसांचा संस्कार होता. तेच संस्कार आम्हा भावंडांना तिने दिले. आईवर शाहू महाराज, फुले दाम्पत्य, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता. हीच विचारधारा महाराष्ट्राला शक्ती देईल, यावर तिचा विश्वास होता. आम्ही याच भूमिकेतून काम करीत आहोत. म्हणूनच महिला आरक्षणाचा देशात पहिल्यांदा निर्णय आम्ही घेतला, असे त्यांनी सांगितले. सरपंच नंदा चेचर यांच्या हस्ते पवार यांचा ग्रामदैवत भैरवनाथांची चांदीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर