शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मालवणचा सुपुत्र होणार आयर्लंडचा पंतप्रधान?

By admin | Updated: May 25, 2017 01:40 IST

मालवण तालुक्यातील वराड गावचे सुपुत्र आणि आयर्लंडचे विद्यमान समाजकल्याण मंत्री लिओ अशोक वराडकर यांना पंतप्रधानपदाची संधी चालून आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण (जि. सिंधुदुर्ग) : मालवण तालुक्यातील वराड गावचे सुपुत्र आणि आयर्लंडचे विद्यमान समाजकल्याण मंत्री लिओ अशोक वराडकर यांना पंतप्रधानपदाची संधी चालून आली आहे. ३७ वर्षीय लिओ आयर्लंडचे सर्वांत तरुण मंत्री आहेत. वराडकर आता पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असून, त्यांच्या नावालाच पसंती मिळत आहे. पंतप्रधान एन्डा केनी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी फाईन गिल पक्षात त्या पदासाठी स्पर्धा सुरु झाली असून त्यात गृहनिर्माणमंत्री सिमोन कोवेनी हे वराडकर यांचे मुख्य स्पर्धक आहेत. मात्र, लिओ वराडकरांना सर्वाधिक पाठिंबा मिळत आहे. पंतप्रधानपदाची निवडणूक २ जून रोजी होत आहे. वराडकर यांनी आतापर्यंत आरोग्यमंत्रिपदासह क्रीडा, सांस्कृतिक, वाहतूक अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. मंत्री लिओ वराडकर हे व्यवसायाने डॉक्टर असून आयर्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दोन वेळा निवडून आले आहेत. लिओ यांचा जन्म वराड गावचा असला तरी गेल्या ३७ वर्षांत ते एकदाही जन्मगावी आलेले नाहीत. मात्र त्यांचे वडील डॉ. अशोक विठ्ठल वराडकर दर दोन वर्षांनी वराड (ता. मालवण) येथे सपत्नीक भेट देतात. लिओ यांना भारतात येण्याची प्रचंड इच्छा आहे. मात्र ते आयर्लंडच्या राजकारणात भरपूर व्यस्त असतात, असे वडील डॉ. अशोक वराडकर यांनी २०१३ साली सांगितले होते. लिओ अद्यापही अविवाहित आहेत. मात्र ते लिओ हे समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे आयर्लंडमध्ये तरुण वर्गात ते जास्त लोकप्रिय आहेत.कोकणच्या मातीशी नाते सांगणार लिओ वराडकर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याने जिल्हावासीयांचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे. लिओने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकारणात पाऊल टाकले. आम्ही त्याला विरोध केला नाही. त्याच्या कर्तृत्वावर आमचा उभयतांचा विश्वास आहे. कामात व्यस्त असल्याने त्याला जन्मगावी येत येत नाही. मात्र पंतप्रधान झाल्यावर जन्मगावी येण्याची त्याची इच्छा आहे, असे लिओची आई मेरियम वराडकर यांनी सांगितले.