शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल तासभर चाललेली घोषणाबाजी आणि राड्यानंतर आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यातून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 14:00 IST

Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: तासभर चाललेला राडा आणि तणावाच्या परिस्थितीनंतर आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यामधून बाहेर पडले. दरम्यान, आदित्य ठाकरे महाविकास आघाडीकडून आयोजित मोर्चामध्ये सहभागी होणार असून, ते मोर्चाला संबोधित करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून दुर्घटना झालेल्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आज ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने सामने आल्याची धक्कादायक घटना घडली. सुमारे तासभर घोषणाबाजी, आरोप प्रत्यारोप आणि धक्काबुक्की सुरू असताना दोन्हीकडचे कार्यकर्ते किल्ल्यामधून हटण्यास तयार नव्हते. यादरम्यान जयंत पाटील यांनी दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनीही चर्चा केली. अखेरीस तासभर चाललेला राडा आणि तणावाच्या परिस्थितीनंतर आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यामधून बाहेर पडले. दरम्यान, आदित्य ठाकरेमहाविकास आघाडीकडून आयोजित मोर्चामध्ये सहभागी होणार असून, ते मोर्चाला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, आज राजकोट येथे घडलेल्या राड्याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार भाजपा नेते खासदार नारायण राणे हे दुर्घटनास्थळी पोहोचून पाहणी करत असताना आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते तिथे दाखल झाले. आदित्य ठाकरे किल्ल्याच्या परिसरात पोहोचताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. तर बाहेरच्या लोकांना किल्ल्यात घेणार नाही, अशी भूमिका राणे समर्थक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर किल्ला परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. तसेच दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण अधिकच तंग झाले. 

अखेर या तणावाच्या परिस्थितीतच आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. यादरम्यान, जयंत पाटील यांनी तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनीही दोन्ही बाजूंची समजूत घातली. अखेरीस आदित्य ठाकरे राजकोट किल्ला परिसरातून बाहेर पडले. आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते किल्ल्यातून बाहेर पडेपर्यंत नारायण राणे आणि त्यांचे समर्थक हे किल्ल्यामध्ये उपस्थित होते. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेsindhudurgसिंधुदुर्गMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNarayan Raneनारायण राणे