ठाणे : कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील सह्यादीच्या डोंगरात असलेल्या माळशेज घाटात मंगळवारीदेखील १३ छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्या. सततचा पाऊस आणि दाट धुक्यांमुळे या दरडींचा मलबा हटवण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. ठाणे जिल्हा प्रशासन, पोलीस आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घाटातील मलबा आणि दगड दूर करण्याचे शर्थीचे प्रयत्न अहोरात्र सुरू असल्याचा दावा केला जात आहे. घाटातील या मदतपथकाशी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकरे स्वत: संपर्क ठेऊन आहेत.संतत धार सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या घाटात शनिवार, रविवारपासून डोंगर कड्याचा ओला मुरूम आणि मोकळे झालेले मोठे दगड महामार्गावर घसरल्याने रस्ता बंद झाला. शनिवारी कोसळलेल्या दरडीचा सुमारे १२ मीटर रु ंद आणि १२० मीटर लांब असलेला दगड मातीचा ढिगारा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु, पाऊस आणि धुक्यामुळे या कामात प्रचंड अडथळे येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)महामार्गावरील दगड, माती हटवण्यासाठी चार जेसीबी , दोन पोकलेन तैनात आहेत. याशिवाय दरीत पडलेला ट्रक काढण्याचे अद्याप ही प्रयत्न सुरु आहेत. या ट्रकचा जखमी क्लीनरला रु ग्णालयात दाखल केले असून चालकचा शोधणे सुरु आहे. या ट्रकमध्ये तेलाची पिंपे असल्यामुळे ते खाली करतानाही अडथळा येत आहे. बचाव कार्याचा अनुभव असलेल्या एका स्वयंसेवी पथकाचे कार्यकर्तेदेखील या कामी मदत करीत आहेत. तर घाटाखालील गावांतील लोक प्रशासनाच्या मदतीला धावून आले असून ते मदत पथकाला सहकार्य करीत आहेत. १शिरोशी : माळशेज घाटात रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून एक ट्रक खाली दरीत गेला असून त्यामध्ये शेरअली अहमद सय्यद, रा, अहमदनगर हा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. तो शिवडी, मुबंई येथून शनिवारी रात्री दीडच्या सुमारास अहमदनगर येथे जात असतांना माळशेज घाटात रविवारी सकाळी दरड ट्रकवर पडल्याने ट्रक दरीत गेला. तीन दिवस उलटले तरी चालक शेअरअलीचा मृतदेह मिळत नसल्याने त्याच्या शोधासाठी पुण्यावरून गिर्यारोहक मागविला आहे. त्याच्या मदतीने बेपत्ता चालकाची शोध मोहीम सुरूच आहे.२मुरबाड तहसीलदार म्हस्के पाटील कल्याण प्रांतधिकारी प्रसाद उकीरडे पाटील टोकावडे पोलीस पंकज गिरी व विजय धुमाळ हे ही त्याच्या शोधासाठी रात्रंदिवस लक्ष ठेवून आहेत. ३दरम्यान घाटात कोसळलेल्या दरडींच्या ढिगाऱ्याचे स्वरूप पाहता अजून किमान चार दिवस तो खुला होणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा आपत्ती यंत्रणा तो लवकरात लवकर सुरू होण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. घाटात १२ ठिकाणी दरडी पडल्या असल्याने त्यात असंख्य ट्रक - टेम्पो अडकले असून त्यांच्या चालक-क्लिनरना खाण्यापिण्यासाठी घाटात कोणतीच सोय नसल्याने सावर्णे येथील गांवकरी त्यांना जेवण देत आहेत.तेलाचे पिंप घेऊन अहमदनगरच्या दिशेने जाणारा ट्रक दरड कोसळत असतानाही चालकाने नेण्याचा प्रयत्न केला. या ट्रकच्या मागे प्रवाशांनी भरलेली खाजगी बस सुद्धा या ठिकाणी काही अंतरावर होती.
माळशेज घाटात पुन्हा १३ दरडी कोसळल्या
By admin | Updated: July 13, 2016 04:08 IST