शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पुनर्वसनासाठी माळीण रोल मॉडेल, पाणीप्रश्नासाठी 14.77 लाखाला मंजुरी : मुख्यमंत्री

By admin | Updated: April 2, 2017 19:32 IST

शासन आणि प्रशासन यांनी एकत्रीत काम केल्यास माळीणसारखे सुंदर पुनर्वसन होते,या दोन्ही यंत्रणा संवेदनशील असतील तर काय होऊ शकते याचे सुंदर उदाहरण म्हणजे माळीण

ऑनलाइन लोकमत
पुणे (घोडेगाव), दि. 2 - शासन आणि प्रशासन यांनी एकत्रीत काम केल्यास माळीणसारखे सुंदर पुनर्वसन होते. या दोन्ही यंत्रणा संवेदनशील असतील तर काय होऊ शकते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे माळीण असल्याचे सांगत राज्यात यापुढे पुनर्वसनासाठी माळीणचे रोल मॉेडेल वापरणाार असल्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
डोंगराचा कडा कोसळल्यामुळे गाडले गेलेले माळीण गाव पुन्हा एकदा नव्या दमाने उभे राहत आहे. माळीणशेजारीच आमडे गावात हे पुनर्वसन करण्यात आले आहे. एखादी आपत्ती घडल्यानंतर त्याठिकाणाहून विस्थापित होणा-या लोकांचे पुनर्वसन किती चांगल्या प्रकारे होऊ शकते याचे रोल मॉडेल म्हणून नव्याने उभ्या राहिलेल्या माळीण या गावाकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करून त्याचे लोकार्पण करण्याचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दोन ग्रामस्थांना घराच्या चाव्या व संसारोउपयोगी वस्तू दिल्या.
या कार्यक्रमाला महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट,  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय आणि विशेष साह्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विधान सभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्, जिल्हाधिकारी सौरव राव आदी मान्यवर उपस्थित होते. 
मुख्यमंत्री म्हणाले , जिल्हाधिकारी व शासकीय यंत्रणेने अतिशय संवेदनशीलतेने हे काम लवकर पूर्ण केले.  हे आदर्श पुनर्वसन होण्याकरीता सरकारी यंत्रणा पुरी पडली नसती. समाजातील लोकांनी वाटा उचलल्याने हे पुनर्वसन आपण करू शकलो.  मुख्यमंत्र्यांनी सुरूवातीला कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर तेथील एक घराची पाहणी केली. 
पाणी प्रश्न सोडविणार
माळीनचे पुनर्वसन झाले आहे. मात्र येथील ग्रामस्थांना पाणी टंचाई जानवू नये म्हणून आसाने येथील तलावातून पाणीयोजना करनार असून यासाठी १४ कोटी ७७ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यादिली असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.