शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर...', मालदीव वादावर शरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 15:58 IST

'माझी खासदारकी सध्याची टर्म संपल्यानंतर यापुढे निवडणूक लढवणार नाही. तोपर्यंत काम करत राहणार आहे.'

India vs Maldive: अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे भारतात तीव्र प्रतिसाद उमटले आणि सोशल मीडियावरही बायकॉट मालदीव ट्रेंड करत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

शरद पवार म्हणाले की, 'नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. इतर देशातील कोणी आपल्या देशाच्या पंतप्रधानांविरोधात बोलत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आपल्या देशात त्यांच्याशी कितीही मतभेद असले तरी, इतर देशांतील लोक आपल्या पंतप्रधानांबद्दल बोलू शकत नाहीत,' अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

निवडणूक लढणार नाहीकाही काळापासून अजित पवार सतत शरद पवारांना त्यांच्या वयाबद्दल टोमणे मारत होते. यावेळी पवारांनी खासदारकीबाबत मोठे वक्तव्य केले. 'माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे, खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही. तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथे पाठवले आहे, तिथे काम करू नको का? 1967 पासून मी राजकारणात आहे. माझ्या विरोधकांनीही कधी वयावरून टीका केली नाही. अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथे मी काम करत राहणार आहे', असे शरद पवारांनी म्हटले आहे. 

राम श्रद्धेचा विषय आहेदरम्यान, अयोध्येतील राम मंदिराचा भव्य सोहळा आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, 'राम श्रद्धेचा विषय आहे. पक्षांकडून रामाबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य पक्षाचे‌ विधान नाही. मुंबईचे पालकमंत्री शाळांमध्ये रामाबाबत स्पर्धा घेण्यासाठी सक्ती करत आहेत हे योग्य नाही. हा सेक्युलर देश आहे. गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही, राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर जाईन,' असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीMaldivesमालदीवlakshadweep-pcलक्षद्वीपAjit Pawarअजित पवार