शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मला आमदार करा, मानधन फक्त १ रुपया द्या, बाकी...; शेतकरी पुत्राचं राज्यपालांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:08 IST

वास्तविक पाहता १२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपाल अडचणीत असताना हे प्रकरण न्यायालयातही गेले.

बीड - राज्यातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न अद्यापही रेंगाळलेला आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यात आता बीडमधील एका शेतकरी पुत्राने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मला आमदार करा असं मागणी करणारे पत्र पाठवले आहे. त्यामुळे या पत्राला राज्यपाल काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचे आहे. श्रीकांत गदळे हे स्वतः शेतकरी असून केज तालुक्यातील दहिफळ गावचे रहिवासी आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यपाल कोट्यातून आमदार करावं अशी मागणी गदळे यांनी राज्यपालांकडे केली आहे. विशेष म्हणजे या पदावर नियुक्ती केल्यास मिळणाऱ्या मानधनातून केवळ एक रुपया प्रति महिना स्वतःसाठी घेईल आणि उर्वरित रक्कम राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी खर्च करेल असा लेखी बॉंडच गदळे यांनी  दिला आहे. 

वास्तविक पाहता १२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपाल अडचणीत असताना हे प्रकरण न्यायालयातही गेले. १२ आमदारांची नियुक्ती मागील दोन वर्षांपासून रखडली आहे. त्यातच आता गदळे यांनी ही मागणी केल्याने एकच चर्चा होत आहे. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात १२ जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे पाठवली होती. परंतु ही नावे राज्यपालांनी मंजूर केली नाहीत. त्यानंतर मविआ सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यामुळे आता ही १२ नावे बदलण्यात येणार असल्याचंही बोलले जात आहे. परंतु सत्ताधारी आणि विरोधक यांच्या कुरघोडीच्या राजकारणात विधान परिषदेतील १२ जागा अद्यापही रिक्त आहेत. 

याबाबत श्रीकांत गदळे म्हणतात की, राज्यात ३-४ वर्ष उलटली तरी राज्यपाल नियुक्त १२ जागा आजही रखडल्या आहेत. या १२ जागा सामाजिक, कला आणि क्रिडा या क्षेत्रातून येत असतात. या विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आमदार कटिबद्ध असतात. ज्यापद्धतीने या जागा प्रलंबित आहेत. त्यातील १२ जागांपैकी एका जागेवर मला संधी द्यावी. मी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याची संधी राज्यपालांनी मला द्यावी. जर ही नियुक्ती केली तर मिळणारे मानधन केवळ १ रुपया घेईन आणि उर्वरित पैसे राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी वापरेन अशी ग्वाही देतो असं त्यांनी बॉन्डवर लिहून दिले आहे.  

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी