शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात 123 शहरे प्रदूषित , महाराष्ट्रातील या 17 शहरांचा समावेश; 2022 पर्यंत महाराष्ट्र प्रदुषणमुक्त करा: पर्यावरण राज्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 17:29 IST

प्रदुषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत, 2022 पर्यंत महाराष्ट्र प्रदुषणमुक्त करा असं आवाहन पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देप्रदुषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेतदेशात 123 शहरे प्रदूषित आहेत. त्यात महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश आहे.

मुंबई, दि. 22 - प्रदुषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत,  2022 पर्यंत महाराष्ट्र प्रदुषणमुक्त करा असं आवाहन पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी केले आहे. पर्यावरण विभागातर्फे आयोजित एक दिवसीय ‘शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र 2022’ या विषयावरील राष्ट्रीय परिषेदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं. 

देशात 123 शहरे प्रदूषित आहेत. त्यात महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश आहे. प्रदुषण मुक्तीसाठी शासन आपल्या स्तरावर विविध उपाययोजना करीत असले तरी प्रत्येकाने स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून करावी. प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. महानगरपालिकेने 25 टक्के निधी प्रदुषणाव्यतिरिक्त महत्वाच्या कामासाठी खर्च केला पाहिजे. जिल्हाधिकारी, आयुक्त आणि महापौर यांनी हे काम मिशन म्हणून हाती घेतले पाहिजे. ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. हा प्रश्न जगातील अनेक राष्ट्रांना भेडसावत आहे. म्हणूनच आपल्या शहरात, गावात, शाळेत, समाजात आणि कुटुंबात याविषयी जागृती झाली पाहिजे. सांडपाणी, कचरा यांची योग्यरित्या विल्हेवाट लावली पाहिजे, असं पोटे-पाटील म्हणाले.निकृष्ट हवा असणारी 17 शहरे - केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील ज्या शहरामध्ये हवा गुणवत्तेची पातळी निर्धारित मानकापेक्षा अधिक आहे यांची नावे पुढीलप्रमाणे : अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर,जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर व उल्हासनगर या परिषदेला केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष एस.पी.एस परिहार, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, आयआयटी मुंबईचे प्रा. वीरेंद्र शेटी, विविध महानगरपालिकेचे महापौर, जिल्हाधिकारी, आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

अप्पर मुख्य सचिव सतीश गवई म्हणाले, आपल्याकडे वाहनांचे आणि कारखान्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. ते थांबविणे गरजेचे आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी प्रदुषणावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. नव्या पिढीला शुद्ध हवा, शुद्ध पाणी, स्वच्छ रस्ते देणेही आपली जबाबदारी आहे. महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांनी आपले शहर 100 टक्के कसे स्वच्छ होईल, प्रदूषण कसे थांबेल यावर कामाला सुरुवात करणे चांगल्या समाजासाठी, उद्याच्या स्वच्छ भारतासाठी आवश्यक आहे.