शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू राष्ट्रासाठी भागवतांना बनवा राष्ट्रपती, शिवसेनेची मागणी

By admin | Updated: March 27, 2017 19:34 IST

भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव पुढे केलं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27-  भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव पुढे केलं आहे. राष्ट्रपतीपदासाठी जुलै महिन्यात निवडणूक होणार आहे. 
 
भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी मोहन भागवत हेच भारताचे राष्ट्रपती बनणं उचीत ठरेल. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर भागवतांना राष्ट्रपती करावं अशी मागणी शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे .
 
नरेंद्र मोदींच्या रूपात प्रखर हिंदूत्ववादी नेता भारताचा पंतप्रधान आहे. योगी आदित्यानाथांच्या रूपात आणखी एका हिंदूत्ववादी नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याता आलं आहे. त्यामुळे आता हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोहन भागवत यांनाच राष्ट्रपती बनवणं योग्य ठरेल असं राऊत म्हणाले.  
मोहन भागवत यांचं नाव आघाडीवर-
भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी जुलै महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राजधानी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याची बातमी विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे. शुक्रवारी रात्री सरसंघचालक भागवत दिल्लीत येत असून पुढले दोन दिवस त्यांचे वास्तव्य राजधानीतच असल्याने या चर्चेला विशेष उधाण आले आहे. पाच राज्यांच्या अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर, जुलै महिन्यातल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या पसंतीचा राष्ट्रपती निवडून आणण्याची क्षमता आणि संख्याबळ भाजपकडे आहे. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी नुकतीच योगी आदित्यनाथ यांची निवड झाली.
 
रा.स्व. संघाने त्यात महत्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे सर्वोच्च घटनात्मक पद भाजपला मार्गदर्शन करणारी मातृसंस्था रा.स्व.संघाच्या सर्वोच्च व्यक्तिकडेच का नसावे? असा विचार सुरू झाला. भागवतांना संधी मिळाल्यास देशात व जगात संघाबाबत पसरवण्यात आलेला गैरसमजही दूर होईल व देशाला एक कणखर राष्ट्रपती मिळेल अशी चर्चा सुरू झाल्याचे समजले आहे. रा.स्व. संघात डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरूजींनंतर मोहनराव भागवतांचे नाव कणखर व तत्वनिष्ठ सरसंघचालक म्हणून घेतले जाते. के.एस.सुदर्शन यांच्यानंतर २१ मार्च २00९ साली मोहनराव भागवतांनी सरसंघचालक पदाची सूत्रे हाती घेतली. देशभर संघपरिवाराच्या विविध शाखांचा व भाजपचाही त्यांच्या कारकिर्दीत व्यापक व लक्षवेधी विस्तार झाला. निवडणुकांमधे भाजपला हमखास विजय प्राप्त करून देणारी संघाची मजबूत व सतर्क यंत्रणा तयार करण्यातही भागवतांनी विशेष मेहेनत घेतली आहे.
 

महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात १९५0 साली जन्मलेल्या भागवतांनी चंद्रपूरच्याच जनता कॉलेजमधून बी.एस्सी. पदवी प्राप्त केल्यानंतर नागपूरच्या सरकारी पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुविज्ञान शाखेचीही पदवी मिळवली. याच शाखेचे पदव्युत्तर शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ संघाच्या प्रचारकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. सुरूवातीला महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यात प्रचारक म्हणून कामगिरी बजावल्यानंतर विदर्भ व नागपुरात प्रांतचालकापर्यंत वेगवान प्रगती करीत कालांतराने राष्ट्रीय स्तरावर भागवत संघाचे सरकार्यवाह झाले.

सुदर्शन यांच्यानंतर सरसंघचालकपदासाठी भागवतांच्या तुलनेत संघाकडे दुसरे नाव नव्हते. असे म्हणतात की रा.स्व.संघाचे सरसंघचालकपद हे सक्रिय राजकारणापासून दूर असल्याने पंतप्रधानपदापेक्षाही मोठे आहे, असे संघात मानले जाते. बहुदा त्याला अनुसरूनच पंतप्रधान मोदींच्या शपथविधीलाही भागवत उपस्थित नव्हते. केंद्रात मोदी सत्तेवर आल्यापासून आजतागायत पंतप्रधानांच्या ७ रेसकोर्स या अधिकृत निवासस्थानीही भागवत फिरकलेले नाहीत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यासाठी कृष्णमेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या एकमेव सोहळयात पंतप्रधान मोदी आणि मोहनराव भागवत सार्वजनिकरित्या एकत्र दिसले.

संघाच्या तत्वज्ञानाबद्दल इतकी निष्ठा बाळगणारे भागवत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला सहजासहजी तयार होतील काय? हा प्रश्न देखील या निमित्ताने चर्चेत आहे. संघाच्या दिल्लीतील सूत्रांशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र या विषयी अधिकृत अथवा अनधिकृतरित्या कोणतेही भाष्य करायला कोणी तयार नाही.