शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 07:54 IST

Manoj Jarange Patil: चार महिन्यांपूर्वी मुंबईला जाण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह आमदारांशी बोलणे झाले. परंतु, सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आता २७ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईकडे निघणार आहोत. सरकारकडे दोन दिवस आहेत. तोपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

वडीगोद्री (जि. जालना)  - चार महिन्यांपूर्वी मुंबईला जाण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह आमदारांशी बोलणे झाले. परंतु, सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आता २७ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईकडे निघणार आहोत. सरकारकडे दोन दिवस आहेत. तोपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. मुंबईत येणाऱ्या मुलांवर काठी उगारली, तर आपण सरकारच उलथवून टाकू, असेही ते म्हणाले.

जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. मराठा- कुणबी एकच आहेत, हा जीआर काढा, सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, दाखल सर्व गुन्हे मागे घ्यावेत, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी आणि अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी दोन वर्षांपासून लढा सुरू आहे. परंतु, आश्वासनांपलीकडे सरकारकडून काहीच मिळालेले नाही. आम्हाला आरक्षण दिले, तर मुंबईला येणार नाही, असेही ते म्हणाले. 

२७ ऑगस्ट : अंतरवाली सराटी, शहागड फाटा, साष्टपिंपळगाव, आपेगाव, पैठण, घोटण, शेवगाव, मिरी मका, पांढरीपूल, अहिल्यानगर बायपास, नेप्ती चौक, आळे फाटा ते शिवनेरी किल्ला, जुन्नरला मुक्काम. २८ ऑगस्ट :  राजगुरुनगर, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे मुंबईतील आझाद मैदान. २९ ऑगस्ट : सकाळी उपोषणाला प्रारंभ.     

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबई