पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या मतदानानंतर, आज १६ जानेवारी रोजी होत असलेल्या मतमोजणीत भाजप आणि महायुतीने राज्यासह पुणे महानगरपालिकेतही आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. पुण्यात भाजपने आपला गड पुन्हा एकदा सुरक्षित राखला असून, विरोधी महाविकास आघाडीला, विशेषतः शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना मोठा धक्का बसला आहे.
सर्वात मोठी खळबळ पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभागातच त्यांचा पराभव होताना दिसत आहे. वसंत मोरे स्वतः पिछाडीवर असून, त्यांच्या मुलालाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
वसंत मोरेंना घरचा आहेरपुणे मनपा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष वसंत मोरे यांच्याकडे होते. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच मोरेंना धक्के बसत आहेत. त्यांच्या मुलाचा या निवडणुकीत पराभव झाला असून, खुद्द वसंत मोरे देखील प्रभागात पिछाडीवर आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी व्यंकोजी खोपडे यांनी २७८० मतांसह मोठी आघाडी घेतली आहे. ठाकरे गटासाठी हा पुण्यात सर्वात मोठा सेटबॅक मानला जात आहे.
वाचा - Municipal Election : पोलिसाला सहन झाली नाही थट्टा! स्वाभीमानाने परत केला निवडणूक भत्ता
का चालली महायुतीची सुसाट घोडदौड?राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी बहुतांश ठिकाणी महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. पुण्यात भाजपने गेल्या ५ वर्षात केलेली विकासकामे, मेट्रोचा विस्तार आणि केंद्रातील योजनांचे पाठबळ यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा 'कमळा'ला पसंती दिली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील विसंवाद आणि स्थानिक नेत्यांची गटबाजी त्यांना महागात पडल्याचे चित्र दिसत आहे.
Web Summary : BJP dominates Pune Municipal Corporation elections. Vasant More, a key Thackeray leader, trails significantly. His son also lost. Mahayuti's development work and MVA's infighting led to BJP's victory.
Web Summary : भाजपा का पुणे महानगरपालिका चुनावों में दबदबा। ठाकरे के प्रमुख नेता वसंत मोरे काफी पीछे। उनके बेटे भी हारे। महायुति के विकास कार्यों और एमवीए की अंदरूनी कलह से भाजपा की जीत हुई।