शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेश भाजपमध्ये धक्कादायक बदल; चंद्रशेखर बावनकुळे आज करणार कार्यकारिणीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 09:06 IST

पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक व नंतर विधानसभेची निवडणूक होईल. या निवडणुका समोर रचना केली जाईल. 

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी मुंबईत करणार आहेत. जवळपास ८० टक्के चेहरे कार्यकारिणीत नवीन असतील असे म्हटले जाते. ६ सरचिटणीस, १६ उपाध्यक्ष, १६ सचिव यांच्यासह १०५ जणांची ही कार्यकारिणी असेल. 

एरवी काही आमदारांना सरचिटणीस वा उपाध्यक्षपद दिले जाते. मात्र, यावेळी त्यांना ही संधी दिली जाणार नसल्याचे समजते.  त्याऐवजी पक्षाच्या सर्व आमदारांना विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. 

बदलास केंद्रीय नेतृत्वाची मान्यता  प्रदेश कार्यकारिणीची यादी बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निश्चित केली आणि त्यास पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची मान्यता घेतली. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी फक्त सरचिटणीस बदलले होते. मात्र, अन्य कार्यकारिणी पूर्वीप्रमाणेच होती. 

लवकरच नियुक्ती समन्वयकांची नियुक्ती लवकरच जाहीर केली जाईल. आमदारांकडे त्यांच्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त असलेल्या मतदारसंघांची जबाबदारी दिली जाणार आहे. पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक व नंतर विधानसभेची निवडणूक होईल. या निवडणुका समोर रचना केली जाईल. 

संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून फीडबॅक?  सरचिटणीस, उपाध्यक्ष व सचिव यामध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण दिले जाणार आहे. राज्यातील बहुतेक जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. त्यांच्या नावांची घोषणा १५ ते २० दिवसांत केली जाईल. जिल्हाध्यक्षपदासाठी प्रत्येक जिल्ह्यातून काही नावे काढण्यात आली. त्यांनी पक्षासाठी केलेले कार्य, विविध निवडणुकांमध्ये दिलेले योगदान, त्यांची प्रतिमा आणि जातीय समीकरणे अशा विविध कसोट्यांवर जिल्हाध्यक्ष निश्चित करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांकडून जिल्हानिहाय फिडबॅकदेखील घेण्यात आला आहे, अशी माहिती आहे.

टॅग्स :BJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे