शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबरची आघाडी बेकायदा, शिवसेनेच्या आमदारांचे म्हणणे असल्याचा महेश जेठमलानी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 13:47 IST

Mumbai: शिवसेनेची भाजपसोबतची युती पक्षाच्या हितासाठी नैतिक आणि तात्त्विक फायद्याची होती. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची महाविकास आघाडी ही बेकायदा व मतदारांचा विश्वासघात करणारी होती, असे एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांचे म्हणणे होते.

मुंबई -  शिवसेनेची भाजपसोबतची युती पक्षाच्या हितासाठी नैतिक आणि तात्त्विक फायद्याची होती. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची महाविकास आघाडी ही बेकायदा व मतदारांचा विश्वासघात करणारी होती, असे एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांचे म्हणणे होते. त्यामुळे त्या आमदारांनी चुकीचे केले नाही, असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी बुधवारी केला. 

आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. ठाकरे गटाचा ठराव, बैठकीची नोटीस बोगस असल्याचा दावा शिंदे गटाने केल्यानंतर  जेठमलानी यांनी एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्राबाबत प्रश्न विचारत सुनील प्रभू यांना उलटतपासणीत भंडावून सोडले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती मतदारांचा विश्वासघात करणारी होती. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांना शिवसेनेच्या संघटनात्मक पदावरून काढून टाकण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार नव्हता असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला. हा दावा खोटा असल्याचे प्रभू म्हणाले. 

सुनील प्रभूंनी साक्ष बदलली२२ जून २०२२ रोजीचे पत्र एकनाथ शिंदे यांना कोणत्या माध्यमातून दिले, या प्रश्नावर एक - दीड वर्षापूर्वीचे मला आठवत नाही, पण व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून दिले, असे उत्तर प्रभू यांनी दिले. व्हॉटस्ॲप मेसेज सादर करू शकता का, या प्रश्नावर नेमके सांगू शकत नाही, उद्या सादर करण्यासाठी प्रयत्न करतो असे उत्तर प्रभू यांनी दिले. 

‘कायदेशीर पेच निर्माण हाेऊ नये म्हणून इंग्रजीत पत्र’तुम्ही हे पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिले आहे का? त्याचा अर्थ तुम्हाला कोणी मराठीत सांगितला का? असा प्रश्न जेठमलानी यांनी केला त्यावर हो असे उत्तर प्रभू यांनी दिले. हे पत्र इंग्रजीत का लिहिले, या प्रश्नावर भविष्यात कायदेशीर बाबींसाठी आवश्यकता भासू शकते म्हणून इंग्रजीत लिहिल्याचे प्रभू यांनी सांगताच  कायदेशीर पेच उद्भवू शकतो असे का वाटले, असे जेठमलानी यांनी विचारले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSunil Prabhuसुनील प्रभूvidhan sabhaविधानसभा