शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महेश आहेर यांच्याकडील कार्यभार काढून चौकशी, उद्याेगमंत्री उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 07:29 IST

मुख्यमंत्र्यांना दारूच्या नशेत फोन करण्याची हिंमत करणाऱ्या या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी बुधवारी विधान परिषदेत विरोधकांकडून करण्यात आली.

मुंबई : ठाण्यातील राष्ट्रवादीच्या  लोकप्रतिनिधीसह त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देणारे टीएमसी सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर ५०० घरे बळकावल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. मुख्यमंत्र्यांना दारूच्या नशेत फोन करण्याची हिंमत करणाऱ्या या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी बुधवारी विधान परिषदेत विरोधकांकडून करण्यात आली. यावर संबंधित अधिकाऱ्याचे अधिकार काढून घेऊन चौकशी केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

विधान परिषदेत आमदार विलास पोतनीस यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांकडून आणि फेरीवाल्यांकडून दररोज लाखो रुपयांचे वसुली करत असून याबाबतच्या चित्रफिती व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणातील चित्रफितींची सत्यता तपासून या अधिकाऱ्याला बडतर्फ करणार का, असा सवाल पोतनीस यांनी केला. त्यावर सामंत यांनी एसआयटी चौकशीत असा टीएमसीचा एकही अधिकारी नाही, असा अहवाल आहे, अशी माहिती दिली. तेव्हा अनिल परब यांनी अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करावे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणी निवेदन द्यावे, अशी मागणी केली. या अधिकाऱ्याची ३० दिवसांच्या आत सविस्तर चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत त्याचा कार्यभार काढून घेतला जाईल, अशी घोषणा सामंत यांनी केली.

उपसभापतींचे मौन, सदस्यांची विनवणी   सीआयडी चौकशी सुरू असताना त्या व्यक्तीला पदावरून हटविले जात नाही हा काय प्रकार आहे, असा प्रश्न उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला.   चौकशी नि:पक्षपाती  होण्यासाठी अधिकाऱ्याला निलंबित करावे, असे निर्देश त्यांनी दिले.   मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे बोलण्याची संधी मिळत नसल्याने संतप्त झाले होते.   त्यावर उपसभापती गोऱ्हे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.   मी काही न बोलता लक्षवेधी होईपर्यंत मौन पाळते असे जाहीर केले.   त्यामुळे महाविकास आघाडीचे आमदार चांगलेच कोंडीत सापडले. अखेर माफी मागतो, असे परब म्हणाले.   तर भविष्यात सभागृहात असे काही घडणार नाही, असे शिंदे म्हणाले आणि विषयावर पडदा पडला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत