शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या पुनर्रचनेला आचारसंहितेचा फटका ; डेडलाइन पुन्हा हुकण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 01:59 IST

लोकसभा निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता, जून महिन्यात येणारा पावसाळा आणि याच कालावधीत विधानसभा निवडणुकीसाठी लागू होणारी आचारसंहिता; अशा तीन प्रमुख घटकांमुळे महावितरणच्या पुनर्रचनेला आता डिसेंबर उजाडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता, जून महिन्यात येणारा पावसाळा आणि याच कालावधीत विधानसभा निवडणुकीसाठी लागू होणारी आचारसंहिता; अशा तीन प्रमुख घटकांमुळे महावितरणच्या पुनर्रचनेला आता डिसेंबर उजाडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.महावितरणच्या पुनर्रचनेसाठी १ जानेवारी, १ फेब्रुवारी, १ मार्च डेडलाइन ठेवण्यात आली होती. मात्र अडचणींमुळे प्रशासनाला ही डेडलाइन पाळता आली नाही. परिणामी, १ एप्रिल ही डेडलाइन ठरविण्यात आली. मात्र आता लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. परिणामी, या काळात महावितरण प्रशासन पुनर्रचना लागू करेल की नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. जरी प्रशासनाने पुनर्रचना लागू केली तरी कामगार संघटना, राजकीय हेवेदावे यांचा परिणाम पुनर्रचनेवर होईल. याचा अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक घटकावर परिणाम होईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत पुनर्रचना लागू होणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे.लोकसभा निवडणुकीचा निकाल मे महिन्यात लागल्यानंतर जून महिन्यात जरी पुनर्रचना लागू करायची झाली तर हा कालावधी पावसाळ्याचा आहे. आणि पावसाळ्यात सातत्याने विजेचे प्रश्न तोंड आवासून उभे राहतात. परिणामी या काळात पुनर्रचना लागू झाली आणि वीज ग्राहकांना त्रास झाला तर त्याचे खापर प्रशासनावर फुटेल. परिणामी या काळातही पुनर्रचना लागू होणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यानंतर काही कालावधीतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. साहजिकच पुनर्रचना लागू करणे प्रशासनास कठीण होईल, असाही अंदाज वर्तविला जात आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच पुनर्रचनेला मुहूर्त मिळेल आणि त्यासाठी डिसेंबर उजाडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.पहिल्या टप्प्यात प्रायोगिक अंमलबजावणीपहिल्या टप्प्यात पुणे परिमंडळमधील रास्तापेठ व गणेशखिंड मंडळ, भांडुप परिमंडळमधील वाशी व ठाणे मंडळ आणि कल्याण परिमंडळातील कल्याण मंडळमध्ये महावितरणच्या पुनर्रचना आराखड्याची प्रायोगिक अंमलबजावणी होणार आहे.कामगारांनी पुकारलेला संप, केलेला विरोध आणि प्रक्रिया राबविण्यात येत असलेल्या अडचणींमुळे अद्याप पुनर्रचना झालेली नाही...म्हणूनच घेतलापुनर्रचनेचा निर्णयवीजग्राहकांनी तक्रार कोणाकडे करायची, हे समजणार. तक्रारींचे वेळेत निरसन, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा, कामाचे सुनियोजन तसेच सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.प्रशासनाचे म्हणणे काय?-कामगार कपात केली जाणार नाही.-नवीन उपविभाग व शाखा कार्यालयांची निर्मिती होईल.-नवीन कार्यालयांची निर्मिती.-अतिरिक्त कामगारांचे समायोजन होईल.असे होणार परिणाम- पुनर्रचनेनुसार चार उपविभागांऐवजीदोन उपविभाग.- तीन ते चार कामांची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यास एकच काम.- त्याच्यावरील कामाचा ताण कमी होणार.- कामाचा दर्जा सुधारून काम लवकर होण्यास मदत होणार.- ग्राहकांच्या समस्या लवकर सुटणार.

टॅग्स :mahavitaranमहावितरण