शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे आता 'एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक '

By admin | Updated: October 20, 2016 20:43 IST

मीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विद्युत विषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामिण भागातील नागरिकांचे वीज पुरवठ्यासंदभार्तील प्रश्न लवकर सुटावेत

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २० : ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विद्युत विषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामिण भागातील नागरिकांचे वीज पुरवठ्यासंदभार्तील प्रश्न लवकर सुटावेत म्हणून महावितरणतर्फे पुरविण्यात येणाऱ्या काही सेवा ग्रामपंचायतींमार्फत उपलब्ध करून देण्यासाठी एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक ही योजना अंमलात आणण्यास तसेच ग्रामपंचायतींनी फ्रेंच्याईझी तत्वावर काम करावे यासाठी ऊर्जा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी दिल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली़ या योजनेमूळे राज्यातील ग्रामिण भागातील २३ हजार आयटीआय धारकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. आयटीआय धारकांना ही दीवाळीची भेट असल्याचेही ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले.

फ्रेंच्याईझी म्हणून मीटर रिंडींग घेणे, वीज देयकांचे वाटप करणे, ब्रेकडाऊन अटेंड करणे, वीजपुरवठा पुर्ववत करणे, डीओ फ्युज टाकणे, फ्युज कॉल तक्रारी अटेंड करणे, रस्त्यावरील पथदिव्यांची देखभाल, दुरूस्ती किंवा बदली करणे, नवीन जोडणीची कामे करणे, थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करणे आदी कामे ग्रामपंचायतींनी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामांकरिता प्रति विद्युत ग्राहक ९ रुपये शुल्क ग्रामपंचायतींना देण्यात येईल. ग्राम विद्युत व्यवस्थापकास प्रतिग्राहक ९ रुपये प्रमाणे प्राप्त होणारे उत्पन्न किंवा ३००० रुपये यापैकी जे अधिक असेल ते महावितरण तर्फे देण्यात येईल. ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे पद कंत्राटी राहील. ग्राम विद्युत व्यवस्थापकाने केलेल्या कामाच्या बदल्यात त्याला देय होणारी रक्कम देण्याबाबतची कार्यपध्दती ग्रामविकास विभागाकडून निश्चित करण्यात येईल. राज्यातील ३००० लोकसंख्यापर्यंतच्या २३६१७ ग्रामपंचायतींमध्ये ही योजना राबविण्यात येईल. या योजनेकरीता १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे असेही महावितरणच्या प्रशासनाने सांगितले.ग्राम विद्युत व्यवस्थापकाने करावयाच्या कामांमधील जोखीम विचारात घेता त्याचे विमा संरक्षाणासाठी महावितरण कंपनी योग्य योजना तयार करेल किंवा त्यापोटी वार्षिक ठराविक रक्कम प्रिमियमसाठी देईल. ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक केल्यानंतर त्याला प्रस्तावित कामे करण्याकरीता आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीची महावितरण कंपनीमार्फत अग्रीम रक्कम किंवा साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्यात येईल.ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याकरीता ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक वृत्तपत्रात जाहीरात प्रसिध्द करण्यात येईल. सदर जाहीरात ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील महत्वाच्या ठिकाणी लावण्यात येईल. ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमणूकीकरीता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेच्या आाधारे (आय.टी.आय चे गुण) सदर व्यक्तीची निवड करण्यात येईल.सदर शैक्षणिक अर्हतेनुसार ग्रामपंचायतीमार्फत योग्य निवड केलेल्या व्यक्तीस विद्युत वाहिनीवर काम करण्याकरीता आवश्यक ते संपूर्ण कौशल्य विकास महावितरण कंपनीमार्फत करण्यात येईल. सदर व्यक्ती प्रस्तावित कामे करण्यास पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र महावितरण कंपनी देईल. महावितरण कंपनीने सदर व्यक्ती प्रमाणद्वारे अपात्र असल्याबाबत कळविल्यास गुणवत्तेनुसार प्रतिक्षा यादीतील पुढील व्यक्तीस प्रशिक्षणासाठी महाविरतण कंपनीकडे पाठविण्यात येईल. सदर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामपचायत सदर ग्राम विद्युत व्यवस्थापकाला ११ महिन्यांकरीता कार्य आदेश देईल. असमाधानकारक काम /अपरिहार्य कारणास्तव ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे कार्य आदेश रद्द करण्याचे अधिकार ग्रामापंचायतीस राहतील. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीमधून वर नमूद अर्हता धारण करणारी व्यक्तीची ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यासाठी पात्र राहील.यासाठी इच्छुक व अर्हताधारक करणारी व्यक्ती एखाद्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध होऊ शकला नाही तर 5 कि.मी. परिसरातील इतर ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्ती ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्याकरीता निवडीसाइी पात्र राहील. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील 5 कि.मी. परिसरातही इच्छुक व अर्हताधारक करणारी व्यक्ती उपलब्ध होऊ शकला नाही तर, महावितरणने राज्यामध्ये नेमलेल्या कंपन्यामध्ये ५ वर्ष काम करणारा कंत्राटी कामगार हा ग्राम विद्युत व्यवस्थापक करीता त्या त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात अर्ज करण्यास पात्र राहील. ग्राम विद्युत व्यवस्थापकावर महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यांचे तांत्रिक नियंत्रण व ग्रामपंचायतीचे प्रशासकीय नियंत्रण राहील.