शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

महारेराचा दणका, ६.७७ कोटींच्या वसुलीसाठी होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 06:30 IST

जारी केलेल्या वाॅरंट्सचा महारेराकडून आढावा घ्यायला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महारेराने रायगड जिल्ह्यातील घर खरेदीदारांना द्यावयाच्या नुकसानभरपाईपोटी ७४ प्रकरणांत १५ कोटी ११ लाखांचे वाॅरंट्स जारी केले होते. यापैकी ६.७७ कोटींच्या २७ प्रकरणांतील वसुलीसाठी पनवेल तहसीलदार कार्यालयाने २० जानेवारी रोजी लिलाव जाहीर केला आहे. महारेराकडे घर खरेदीदारांच्या विकासकांबाबत तक्रारी येतात. यावर सुनावणी होऊन भरपाई देण्याचे आदेश विकासकांना दिले जातात. विकासकांनी रक्कम दिली नाही तर ती वसूल करून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका असते.

जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयांना असतात. म्हणून महारेराकडून असे वाॅरंट्स संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जातात. दरम्यान, हे लिलाव रायगड जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि तहसीलदार, पनवेल व त्यांच्या टीमच्या प्रयत्नाने शुक्रवारी पनवेलच्या तहसील कार्यालयात होणार आहेत. महारेराने जारी केलेल्या वाॅरंट्सची व्यवस्थित अंमलबजावणी होऊन घर खरेदीदारांना दिलासा मिळावा, यासाठी सुरू केलेल्या पाठपुराव्याला मिळणारे हे पहिले यश आहे.

  • महारेराने जारी केलेल्या वाॅरंट्सचा आढावा घ्यायला सुरुवात केली.
  • वाॅरंट्सची वसुली व्हावी, यासाठी राज्यातील १३ जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्रे पाठविली. 
  • रायगड जिल्ह्यातील १५ कोटी ११ लाखांच्या ७४ प्रकरणांचा समावेश होता.
  • ६ कोटी ७७ लाखांच्या २७ प्रकरणी हा लिलाव होणार आहे.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रpanvelपनवेल